दरभंगा, 27 मे : हरियाणातील गुरुग्राममध्ये आपल्या वडिलांना सायकलवरुन घरी आणणाऱ्या ज्योतीच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट काढण्यात येणार आहे. फिल्म निर्माता सह निर्देशक विनोद कापडी यांनी ज्योती आणि तिचे वडील मोहन पासवान यांच्यासह फोनवर बातचीत केली. ज्योती आणि तिचे वडील यांच्या होकारानंतर चित्रपट आणि वेब सीरिज तयार करणारे भागीरथी फिल्म प्रायव्हेट लिमिटेडसोबत हा करार करण्यात आला आहे. इतकचं नाही ज्योतीचे वडील मोहन पासवान यांनी कंपनीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. अद्याप करारच्या रकमेचा खुलासा झाला नाही.
कुटुंबात आनंदाचे वातावरण
चित्रपटाची ऑफर मिळाल्यानंतर संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. ज्योतीच्या वडिलांनी सांगितले की, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. ज्योतीवर चित्रपट निघणार आहे. मला माझ्या मुलीवर गर्व आहे. सोबतच ते पुढे असंही म्हणाले की मुलगा आणि मुलीमध्ये फरक करू नका. आज माझ्या मुलीमुळे माझं नाव झालं आहे.
BFPL च्या प्रवक्त्यांनी दिली माहिती
BFPL चे प्रवक्ता महेंद्र सिंह यांनी दिल्लीत पत्रकार परिषद जारी करीत ही माहिती दिली. ज्योतीची कथा आव्हानात्मक आहे. ती एका मजुराची संघर्ष कथा आहे आणि प्रेरणादायी आहे. निर्माता विनोद कापडी यांनी सांगितले की, ही यात्रा अत्यंत आव्हानात्मक होती. ज्यावर त्यांचा माहितीपट लवकरच येणार आहे. मात्र ज्योतीची कहाणी ते वेगळ्या पद्धतीने दाखवू इच्छितात. कारण यामध्ये पिता आणि मुलीचा संघर्ष आहे.
हे वाचा -4 वर्षांच्या चिमुरडीने केलं असं काही की SP नीही केलं कौतुक, VIDEO झाला व्हायरल
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.