बरेली, 30 ऑगस्ट : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेक दिवस भोजीपुरातील एसआरएमएस रुग्णालयात (SRMS Bareilly) दाखल असलेले समाजवादी पार्टीचे नेता रमन जौहरी यांनी ओव्हरब्रिजवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
रमन यांनी रात्री उशिरा रुग्णालयात कोविड वॉर्डच्या बाहेर निघाले आणि बरेली-नैनीताल हायवेवर स्थित पुलावरुन उडी मारली. या गोष्टीची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली तेव्हा डायल 100 टीमने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कोरोना पॉझिटिव्ह एसपी नेता सुसाइड प्रकरणात रुग्णालयाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे समाजवादी पार्टीच्या अन्य लोकांनी रमन जौहरीच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डायल 112 च्या टीमला भोजीपुरा स्टेशनच्या पूर्व दक्षिण केबिनमध्ये रक्ताळलेल्या परिस्थितीत रमन दिसले. पोलिसांनी त्यांना जिल्ह्या रुग्णालयात दाखल केले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. रमण यांच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांना जबरदस्त धक्का बसला.
एसओ भोजीपुरा मनोज त्यांगी यांनी सांगितले की, रात्री 12.30 मिनिटांच्या जवळपास एसआरएस रुग्णालयातून पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली होती. एक कोरोना रुग्ण रुग्णालयातून पळाला असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. यानंतर कुटुंबीयांनी रमन जौहरी हरवण्याची तक्रार नोंदविली होती. कोरोनाग्रस्त रमन जौहरी रुग्णालयाच्या खिडकीची काच तोडून रात्री साडे 8 वाजता रुग्णालयाच्या बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.