छत्तीसगड, 5 एप्रिल : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बीजापुर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत 22 जवान शहीद झाले. आणि 31 अन्य जवान जखमी झाले. यादरम्यान एक असं चित्र समोर आलं आहे, जे पाहून प्रत्येकाला अभिमान वाटेल. चकमकीदरम्यान एक शीख जवान गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला होता. यादरम्यान दुसऱ्या जवानाला गोळी लागली आणि तो देखील जखमी झाला.
त्याला गोळी लागताच शीख जवानाने आपली पगडी काढून साथीदाराच्या जखमेवर बांधली. ही घटना स्पेशल डीजीपी आरके विजने ट्विट केलं आहे. आणि लिहिलं आहे, शीख जवानाच्या हिमतीला सलाम.
सिख जवान के जज़्बे को मेरा सलाम। https://t.co/drcAOWPTpZ
— RK Vij (@ipsvijrk) April 5, 2021
दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी सांगितलं की, सरकारी नक्षलींद्वारे निर्माण केलेल्या अशांती विरोधात निर्माण प्रत्युत्तर देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. केंद्रीय गृृह मंत्र्यांनी राज्यात शनिवारी नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या 22 जवानांना श्रद्धांजली दिल्यानंतर मंत्र्यांनी ही टिप्पणी केली.
हे ही वाचा -मी देशवासियांना आश्वासन देतो...' नक्षलवादी हल्ल्यानंतर अमित शहांची प्रतिक्रिया
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बीजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे 22 जवान शहीद झाले. आणि 31 जवान जखमी झाले. शहीद झालेल्या 22 कर्मचाऱ्यांमध्ये सात कोबरा बटालियनचे सात कमांडोंसह 7 जवान आणि बस्तरिया बटालियनचा एक जवान सामील आहे. आठ अन्य जिल्हा रिजर्व गार्ड (DRG) आणि सहा विशेष कार्य दलातील (STF) आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सीआरपीएफचे एक इंस्पेक्टर अद्याप बेपत्ता आहेत. .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Naxal Attack