नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : अमर कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत फरीदाबादमध्ये सामूहिक अत्याचाराची (Gang Rape) घटना समोर आली आहे. 23 नोव्हेंबर रोजी ही अल्पवयीन मुलगी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी फरीदाबादला गेली होती. जेथे प्रियकर आला नाही, मात्र पीडितेचा इन्स्टांग्राम फ्रेंड (Instagram Friend) आपल्या दोन मित्रांसह तेथे पोहोचला. यानंतर त्या तिघांनी जबरदस्तीने पीडितेला एका खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
24 नोव्हेंबर रोजी पीडिता कशीबशी आरोपींच्या तावडीतून सुटली आणि तिच्या घरी पोहोचली. त्यानंतर तिने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. अमर कॉलनी पोलीस ठाण्यात या अल्पवयीन मुलीवर वैद्यकीय चाचण्यात करण्यात आल्या. बलात्काराची पुष्टी झाल्यानंतर सामूहिक बलात्कार आणि पोक्सो कलमांखाली त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फरीदाबादमध्ये येथे छापा टाकला आणि तिन्ही आरोपींना अटक केली. सध्या पोलिसांनी आरोपींना तुरूंगात पाठविले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पीडिता आपल्या कुटुंबासह गढी गावात राहते आणि तेथेच शिक्षण घेत आहे. 23 नोव्हेंबर रोजी अल्पवयी पीडिता आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी फरीदाबादला आली होती. येथे तिचा प्रियकर पोहोचू शकला नाही आणि त्याने तिला घरी जाण्यास सांगितलं. मात्र त्याचवेळी पीडितेने आपल्या एका इन्स्टांग्राम मित्राला फोन केला आणि त्याला भेटायला बोलावलं. आरोपी शेरदीन (18), अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी आपला मित्र वसीम खान (22), कासीम खान (22) यांना सोबत घेऊन पोहोचवा. येथे शरेदीनने अल्पवयीन मुलीला आपल्या गाडीत बसवलं. यावेळी गाडीत आधीच वसीम आणि कासीम बसले होते.
हे ही वाचा-धक्कादायक! रुग्णालयात कुत्रा कुरतडत राहिला मुलीचा मृतदेह; लोक VIDEO करण्यात दंग
अशात मुलीने गाडीत बसण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर तिघांनी जबरदस्तीने तिला गाडीत बसवलं आणि बडखल येथे घेऊन गेले. येथे त्यांनी बंद खोलीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी तिचे हात-पाय बांधून तिला खोलीत सोडून दिलं. पीडिता 24 नोव्हेंबर रोजी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटली. घरी आल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांना याबाबत सांगताच त्यांनी छापेमारी करीत तिनही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
इन्स्टाग्रामवर झाली होती मैत्री
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार आरोपी व तिची मैत्री इन्स्टाग्रामवर झाली होती. येथे त्याने पीडितेला आपल्या व्यवसायाविषयी सांगितलं होतं. दोघांमध्ये मैत्री झाली होती. त्यामुळे जेव्हा ती फरीदाबादला गेली तेव्हा तिने आरोपीला फोन करून भेटण्यासाठी बोलावलं. मात्र तो यावेळी आपल्या दोन मित्रांना घेऊन आला.
दिल्लीत महिलांवरील अत्याचार
वर्ष अत्याचार अपहरण
2017 : 2146 3422 3439
2018 : 2135 3314 3482
2019 : 2168 2921 3471
2020 : 1330 1679 2124
(2020 चे आकडे 15 ऑक्टोबरपर्यंतचे आहेत)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gang Rape