रस्त्यावर सापडलं कापलेलं शिर, धड जवळच्या जंगलात... ग्रामस्थ हादरले

रस्त्यावर सापडलं कापलेलं शिर, धड जवळच्या जंगलात... ग्रामस्थ हादरले

कोरोनाच्या संकटात या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. इतक्या क्रुर पद्धतीने कोणी मारलं असेल याचा तपास घेतला जात आहे

  • Share this:

कुल्लू, 14 मे : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाचे कापलेले डोके रस्त्यावर दिसले आणि त्या तरुणाचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण भागातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लूची धार्मिक आणि पर्यटन नगरी मणिकर्णमध्ये कसोलजवळ एका व्यक्तीचे कापलेल्या अवस्थेतील डोकं रस्त्याच्या कोपऱ्यात आढळले. त्या व्यक्तीचे धड जंगलात प़डलेले होते. या घटनेचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीम बोलावण्यात आली आहे.

काय आहे कुल्लूच्या एसपीचं म्हणणं

एसपी कुल्लू गौरव सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी डोके आपल्या ताब्यात घेतलं आहे. हे डोकं तरुणाचं असल्याचे दिसून येत आहे. या तरुणाचे धड जंगलात छिन्न-विच्छीन्न अवस्थेत आढळले. याच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. या तरुणाच्या मानेवर शार्प कट दिसत आहे. मात्र पुढील तपासाशिवाय काही सांगू शकत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सध्या देशभरात कोरोनाचं संकट आहे. अशा परिस्थितीत या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या तरुणाचा कोणी शत्रू होता का यासंदर्भातील तपास करण्यात येत आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीम आल्यानंतर या प्रकरणाचा नेमका उलगडा होईल.

संबंधित -जीवापेक्षाही कर्तव्य महत्त्वाचे; अशा परिस्थितही कोरोना योद्धा ड्यूटीवर

राज्यपालांनी मॉडेलला मदत केल्याची बातमी खोटी, सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल

 

 

First published: May 14, 2020, 10:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading