कोरोनाची लागण झाल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती बिघडली; ICU मध्ये केलं दाखल

कोरोनाची लागण झाल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती बिघडली; ICU मध्ये केलं दाखल

काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनाची लागण झाल्याची बाब सोशल मीडियावर सांगितली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : कॉंग्रेस (Congress) पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahmad Patel) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. अहमद पटेल यांना मेट्रो रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अहमद पटेल यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली होती. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करुन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती.

1 ऑक्टोबर रोजी अहमद पटेल यांनी ट्विटरद्वारे कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरच्या सुरुवातीला पटेल यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. कोरोनाचा चौकशी अहवाल पॉझिटिव्ह होण्याच्या काही दिवस आधी त्यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हजेरी लावली होती.

हे ही वाचा-कर्नाटकात मराठा समाजासाठी महामंडळ, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची घोषणा

त्यांनी कोरोनाबाबत ट्विट केले होते की, 'तपासणीत कोविड 19 आजाराची लागण झाली आहे. अलीकडेच माझ्याशी संपर्क साधलेल्या लोकांनी स्वतःला क्वारंटाइन करून घ्यावे.  कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यातच त्यांची प्रकृती ढासळल्याची बातमी समोर आली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 15, 2020, 5:47 PM IST

ताज्या बातम्या