Home /News /national /

चिकन बिर्याणीच्या नावावर कौवा बिर्याणी विकत होता हा विक्रेता

चिकन बिर्याणीच्या नावावर कौवा बिर्याणी विकत होता हा विक्रेता

तुम्हाला 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'रन' या लोकप्रिय चित्रपटातील दृश्य आठवत असेल. तसं खरंच घडलंय.

    नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : तुम्हाला 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'रन' या लोकप्रिय चित्रपटातील दृश्य आठवत असेल. ज्यामध्ये गणेशची भूमिका साकारणारा अभिनेता विजय राजने 5 रुपयांमध्ये बिर्याणी खाल्ली होती. जी कौवा म्हणजेच कावळ्याच्या मांसाची बिर्याणी होती. तो सीन पाहताना आजही लोक पोट धरून हसतात. या सीनमुळे अभिनेता विजय राजला बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली होती. आता पुन्हा कौवा बिर्याणीचा विषय निघाला आहे. तामिळनाडूतील रामेश्वरमेमधील एका विक्रेत्याला चिकनच्या नावावर कौवा बिर्याणी विकत असताना पकडले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. फूड डिपार्टमेंटने रस्त्याशेजारील चिकन बिर्याणी ठेल्यावर छापा मारला होता. या ठेल्यावर स्वस्तात जो चिकन विकत होता ते खरं तर कावळ्याचे मांस होते. हे पाहून अधिकारीपण अवाक् झाले. रामेश्वरम मदिंरात आलेले श्रद्धाळू कावळ्यांना दाणे घालतात. मात्र दिवसेंदिवस कावळे कमी होत असल्याचे भाविकांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब मंदिराच्या ट्रस्टींना सांगितली. याबाबत पोलिसांनी तपास केला असता अशी माहिती समोर आली की काही लोक कावळ्यांना विषाचे तांदूळ देऊ त्यांना मारुन टाकत आहेत. शिकारी कावळ्यांना विष देऊन मारतात आणि त्यांना एकत्र करुन मांस विक्रेत्यांना विकतात. त्यानंतर पोलिसांनी रस्त्याशेजारी खाद्यपदार्थांच्या गाड्या चालविणाऱ्यांचा तपास केला. येथे चिकनऐवजी कावळ्याचे मांस आढळून आले. हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकड़ून 150 मृत कावळे ताब्यात घेतले आहे. चिकन बिर्याणीचे विक्रेते चिकन लॉलीपॉपच्या नावावर कावळ्याचे पाय देत असल्याचे आरोपींनी सांगितले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या