Home /News /national /

मुलाला भेट दिलेली स्वतःच्या कमाईची संपत्ती वडिलोपार्जित नाही; भाऊ-बहिणीच्या वादावर HCचा निकाल

मुलाला भेट दिलेली स्वतःच्या कमाईची संपत्ती वडिलोपार्जित नाही; भाऊ-बहिणीच्या वादावर HCचा निकाल

भाऊ-बहिणीच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

    मुंबई, 3 एप्रिल : मुलाला गिफ्ट दिलेली वडिलांची स्वत:च्या कमाईची प्रॉपर्टी वारसा संपत्ती मानली जाणार नाही. मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) भाऊ-बहिणीदरम्यान प्रॉपर्टी वादात हा निर्णय सुनावला. डॉक्टर वडिलांचा मृत्यूनंतर भाऊ-बहिणीमध्ये संपत्तीवरुन वाद सुरू होता. मात्र, याचिकाकर्त्या बहिणींची अंतरिम याचिका अंशत: मान्य करत न्यायालयाने व्यवसायाने डॉक्टर असलेल्या भावाला (71) न्यायालयाच्या परवानगीशिवाय फ्लॅट विकू नये किंवा तृतीय पक्षाचे हक्क बनवू नयेत, असे आदेश दिले आहेत. या फ्लॅटमध्ये डॉक्टर आणि त्यांचं कुटुंब राहतं. या प्रकरणात बहिणींचा आरोप आहे की, फ्लॅट जॉइंट फॅमिली फंड आणि आई-वडिलांनी भरलेल्या लोनमधून खरेदी करण्यात आला होता. दोन्ही बहिणींनी गेल्या वर्षी भाऊ आणि त्यांच्या मुलाविरोधात सूट दाखल केला होता. त्यांचं वडिलांचं 2006 आणि आईचं 2019 मध्ये निधन झालं. वडिलांची मुंबईत बरीच संपत्ती होती. बहिणींनी भावावर लावले आरोप... बहिणींचा आरोप आहे की, भावाने गुपचूप आणि वाईट हेतूने 2002 मध्ये वडील जिवंत असताना तिन्ही फ्लॅट स्वत:च्या नावावर करवून घेतले होते. याच्या एक वर्षांनंतर कोणालाही न सांगता ते विकूनही दिले. बहिणींनी आपले वकील प्रमोद भोसल्याच्या माध्यमातून अशी मागणी केली आहे की, संपत्तीला जॉइंट फॅमिला प्रॉपर्टी घोषित केली जावी. ज्यात एक तृतायांश भाग त्यांचाही आहे. तर दुसरीकडे भावाने वकिलामार्फत सांगितलं की, बहिणी आवश्यक फॅक्ट्स लपवत आहेत, त्यामुळे त्यांना कोणताही दिलासा मिळू नये. कोर्टात भावाने सांगितलं की, त्यांच्या वडिलांनी स्वत: संपत्ती कमावली होती. आणि त्यांनी प्रेमाने तिन्ही फ्लॅट त्यांच्या नावावर केले होते. त्यावेळी बहिणींनी याला कधी विरोध केला नाही आणि त्यामुळे गिफ्ट म्हणून दिलेल्या फ्लॅटच्या विक्रीनंतर विकत घेतलेल्या संपत्तीवर दावा करू शकत नाहीत. पुढे भावाने सांगितलं की, त्यांचं चांगलं सुरू आहे आणि पूर्व उपनगरात दोन फ्लॅट खरेदी केले. ज्यातील एक फ्लॅट त्यांनी आपल्या मुलाला गिफ्ट केला आहे. यावरुन त्यांच्या बहिणींसोबत वाद सुरू आहे. हे ही वाचा-‘विनाधर्म, विनाजात प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी महिलेची हायकोर्टात धाव; सांगितलं कारण हाय कोर्टाने सांगितलं की, कोर्टाने सांगितलं की, कायद्याने वडिलांच्या वारसांना स्व-अधिग्रहित मालमत्तेची कायदेशीर भेट देण्याची कायदेशीर क्षमता ओळखली आहे. त्यामुळे भेटवस्तू दिलेल्या मालमत्तेला जॉइंट फॅमिला प्रॉपर्टी म्हटले जात नाही. कोर्टाने पुढे सांगितलं की, प्राथमिक दृष्ट्या बहिणींच्या पक्षात निर्णय जात नाही. पहिलं म्हणजे जेव्हा पालकांची एक प्रॉपर्टी विकण्यात आली होती, त्यावेळी बहिणींना त्यांचा हिस्सा मिळाला होता. आणि दुसरा मुद्दा म्हणजे कुटुंबात करार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने भावाच्या मुलाला गिफ्ट म्हणून दिलेल्या फ्लॅटवर यथास्थिती ठेवण्याचे मान्य केले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai high court

    पुढील बातम्या