मराठी बातम्या /बातम्या /देश /

'या' कारणामुळे निरोगी रुग्णांना पुन्हा होतोय कोरोना, अखेर शास्त्रज्ञांनी शोधले 2 उपाय

'या' कारणामुळे निरोगी रुग्णांना पुन्हा होतोय कोरोना, अखेर शास्त्रज्ञांनी शोधले 2 उपाय

Medical workers in protective suits entering a building under lockdown in downtown Kuala Lumpur, Malaysia, on Tuesday, April 7, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to the public to help curb the spread of the new coronavirus. The new coronavirus causes mild or moderate symptoms for most people, but for some, especially older adults and people with existing health problems, it can cause more severe illness or death. (AP Photo/Vincent Thian)

कोरोनावर ठोस उपाय सापडले नसताना सध्या फॉल्स निगेटिव्ह आणि निरोगी झालेल्या रुग्णांना पुन्हा होणाऱ्या कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 14 एप्रिल : कोरोनावर ठोस उपाय सापडले नसताना सध्या फॉल्स निगेटिव्ह आणि निरोगी झालेल्या रुग्णांना पुन्हा होणाऱ्या कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. फॉल्स निगेटिव्ह म्हणजे कोरोनाची तपासणी केल्यानंतर रुग्णात कोणतीही लक्षणे दिसत नाही. मात्र काही दिवसानंतर त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात. अशा रूग्णांकडून संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. दिल्लीमध्ये नुकतेच असे प्रकरण समोर आले. नोएडा येथील दोन रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र काही दिवसांनी तिसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे फॉल्स निगेटिव्ह सध्या चिंतेचा विषय ठरत असताना अखेर शास्त्रज्ञांनी या मागचे कारण शोधले आहे. भारत व्यतिरिक्त दक्षिण कोरिया सारख्या इतर देशांमध्ये कोव्हिड-19 आजाराने निरोगी झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एका निवेदनात याची नोंद घेतली आहे. WHOच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीयदृष्ट्या बरे झालेल्या रूग्णाची दोन वेळा चाचणी केली पाहिजे. 24 तासांनंतर या दोन्ही चाचणीमध्ये त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह येणे गरजेचे आहे. वाचा-आता हे अँटी-व्हायरल औषध कोरोनाला हरवणार, ICMRने दिली महत्त्वाची माहिती हे आहेत उपाय या चाचण्या आणि त्यांचे निकाल चकित करणारे आहेत. कारण काहीवेळा रुग्णांच्या शरीरातील विषाणू पुर्णपणे मरण पावला नसेल, तरी अशा रुग्णाला पुन्हा कोरोना होऊ शकतो. यासाठी केवळ दोन उपाय आहेत. 1. शरीरात असलेल्या विषाणूची तपासणी. 2. विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात असलेल्या अँटी-बॉडीजची उपस्थिती. कोरोना रुग्णांची दुसरी चाचणी करण्यात येते, त्याला फास्ट टेस्ट किंवा सेरोलॉजिकल टेस्ट म्हणतात. मात्र ही चाचणी एखाद्या व्यक्तीला विषाणूची लागण झाल्यानंतर एका आठवड्यानंतर उपयुक्त आहे. कोरोनाचा सामुहिक प्रकाराचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सर्वेक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात सेरोलॉजिकल चाचण्या उपयुक्त आहेत. भारतात मात्र अशा सेरोलॉजिकल टेस्ट कमी आहेत. वाचा-स्वाइन फ्लूपेक्षा कोरोना खतरनाक; लस मिळाली नाहीतर...,WHOने व्यक्त केली चिंता WHOने दिला हा सल्ला दुसरीकडे, WHOने कोव्हिड-19 प्रकरणे ओळखण्यासाठी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस-पॉलिमरेज चेन रिएक्शन किंवा RT-PCR ही सर्वात सामान्यपणे वापरली जाणारी तपासणी करण्यास सांगितले आहे. या चाचणीत एखादा रुग्ण वाहक आहे की नाही हे शोधण्यासाठी घसा, नाक किंवा श्वसन अवस्थेमधून कोरोनाचा शोध घेतला जातो. चीनमधील प्राथमिक संशोधनात असे सुचविण्यात आले आहे की RT-PCR 10 पैकी तीन प्रकरणांमध्ये चुकीची चाचणी देऊ शकतात. वाचा-'व्होडका प्या, कोणी मरणार नाही'; या राष्ट्रपतींचा कोरोना रुग्णांना सल्ला
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या