Home /News /national /

निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा, SC ने अंतिम याचिका फेटाळली

निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा, SC ने अंतिम याचिका फेटाळली

येत्या 20 मार्च रोजी निर्भयाच्या दोषींना फाशी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे

    नवी दिल्ली, 16 मार्च : दिल्लीला हादरवणाऱ्या 2012 साली झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार (Nirbhaya Gang Rape Case) व हत्या प्रकरणात चौघा नराधमांना आता 20 मार्चला फाशी देण्यात येणार आहे. २० मार्च रोजी निर्भया दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केलेली अंतिम याचिका आज फेटाळून लावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुकेशची याचिका फेटाळून लावली आहे. मुकेश याने त्यांच्या भूल सुधार याचिकेवर पुन्हा सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली होती. वकिलांनी त्याला अयोग्य सल्ला दिल्याचा दावा मुकेशने केला होता. मात्र कोर्टाने याचिका तर्कहीन म्हणून फेटाळून लावली. संबंधित-निर्भया प्रकरण : नराधमांना 20 मार्चला फाशी; अखेरच्या क्षणी का बदलली फाशीची वेळ? याचिकांवर याचिका, तारीख पे तारीख निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकत्रितपणे 20 मार्च रोजी सकाळी फाशी देण्यात येईल. यापूर्वी 3 मार्च फाशीची तारीख ठरली होती. पण एक दोषी पवनकुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका दाखल केल्याने सुनावणी सुरू झाली आणि फाशी रद्द झाली. पवनची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्याची दया याचिका फेटाळली आहे. पवन कुमारने आतापर्यंत सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला असून आता त्यांची फाशी अटळ असल्याचे सांगितलं जात आहे. पवनने गुन्हा केला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यापार्श्वभूमीवर त्याच्या फाशीच्या शिक्षेत बदल करुन जन्मठेप द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. दुसरा दोषी अक्षय यानेसुद्धा नव्याने दया याचिका दाखल केली होती. पण त्याचीही याचिका फेटाळण्यात आली आहे. संबंधित - आता फाशी अटळ? राष्ट्रपतींनी निर्भयाचा दोषी पवनची दया याचिका फेटाळली काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण? - सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता. - सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. - त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला. - यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले. - तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं. - दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. - मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Nirbhaya gang rape case, Supreme court

    पुढील बातम्या