देहरादून, 27 ऑगस्ट : तब्बल 13 महिन्यांनंतर खानपुरचे आमदार कुंवर प्रणव चॅम्पिअन यांची घरवापसी अवघ्या तीन दिवसांतच भाजपसाठी डोकेदुखी ठरली आहे. 24 ऑगस्ट रोजी पार्टीने विश्वासासह चॅम्पिअन यांच्या व्यवहारात बदल झाल्याचा दावा केला होता. मात्र काही तासांच्या आत हा दावा खोटा ठरला आहे.
चॅम्पिअन यांची भाजपमध्ये घरवापसी काय झाली की त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात मिरवणूकच काढली. हॉर्न वाजविण्याऱ्या गाड्यांच्या साथीने चॅम्पिअन आपल्या विधानसभा क्षेत्रात शिरल्यानंतर पुन्हा चर्चेला उधाण आलं. यानंतर भाजपमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र जेव्हा मीडियाने बंशीधर भगत याचा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी याला नकार दिला, ते म्हणाले की चॅम्पिअनने कोणतीही रॅली काढली नाही..आणि शस्त्रही दाखविली नाहीत...
यावर काँग्रेसचं म्हणणं आहे की भाजप 2022 मध्ये अपयश पाहून घाबरली होती आणि भाजपची ही भीती राज्यातील जनतेवर भारी पडत होती. दुसरीकडे पार्टीमध्ये चॅम्पिअनला घेऊन मतभेद वाढत आहेत. अनेकांनी तर यावर नाराजी व्यक्त केली आहे.
पार्टीचे नेता आणि सरकारकडून दर्जा प्राप्त राज्यमंत्री राजेंद्र अण्थवाल म्हणाले की, चॅम्पियन हे पश्चिमी उत्तर प्रदेशची संस्कृती उत्तराखंडमध्ये आणत आहेत. ही उत्तराखंडची संस्कृती नाही. ते पुढे म्हणाले की ही बाब अत्यंक खेदजनक आहे. पार्टीचे प्रदेश प्रवक्ता विनोद सुयाल यांनी सांगितले की, भाजप कधीच दबाव व दिखाव्याचं राजकारण करीत नाही. पार्टीचा छोटा कार्यकर्ता असो वा मोठा सर्वांना याचे पालन करावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP