मराठी बातम्या /बातम्या /देश /

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ही आहे दिलासा देणारी बातमी

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ही आहे दिलासा देणारी बातमी

त्यामुळे सणा सुदीचे दिवस असले तरी बाजारात अनावश्यक गर्दी करू नका असा सल्लाही सरकारने दिला आहे.

त्यामुळे सणा सुदीचे दिवस असले तरी बाजारात अनावश्यक गर्दी करू नका असा सल्लाही सरकारने दिला आहे.

गेल्या 24 तासांमध्ये देशांत 19,235 एवढ्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आत्तापर्यंत 5,34,620 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

  नवी दिल्ली12 जुलै: देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच एक दिलासा देणारी बातमी आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) आकडेवारी प्रसिद्ध केली असून कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण वाढल्याची माहिती त्यांनी दिली आहे. केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच हे प्रमाण वाढलं असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. हा सुधारीत दर हा 62.93 टक्के एवढा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 2,42,362 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशांत 19,235 एवढ्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आत्तापर्यंत 5,34,620 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. (Maharashtra Coronavirus patient ) चिंतेची बाब म्हणजे राज्यात आज Active रुग्णांच्या संख्येने 1 लाखांचा ट्प्पा पार केला. आज नवे 7827 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्याची एकूण संख्या 254427 एवढी झाली आहे. तर Active रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 516 एवढी झाली आहे. आज 3340 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण मृत्यूची संख्या 10289 एवढी झाली आहे. मुंबईत 1243 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या (Mumbai Coronavirus patient) 92988 एवढी झालीय. तर 44 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 5288 एवढी झाली आहे. राज्यात 31904 टेस्ट करण्यात आल्यात त्यात 7827 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मोठी बातमी : उद्या मध्यरात्रीपासून पुण्यात कडक लॉकडाऊन; केवळ या सेवा राहतील सुरू

  जगातील कित्येक देशांमध्ये कोरोना लशीची चाचणी सुरू आहे, अशात आनंदाची बातमी म्हणजे रशियातील कोरोना लशीची (russia corona vaccine) मानवी चाचणी यशस्वी झाली आहे आणि ही लस सुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

  GOOD NEWS: कोरोना लशीची मानवी चाचणी यशस्वी; लस सुरक्षित असल्याचा संशोधकांचा दावा

  रशियातील कोरोनाची लशीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि त्या यशस्वी झाल्या असून लस सुरक्षित पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी माहिती सेचेनोव्ह विद्यापीठाने (Sechenov University ) दिली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. रशियन विद्यापीठाचा हा दावा खरा ठरला तर कोरोनाव्हायरसला रोखणारी जगातील ही पहिली लस ठरेल.

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  पुढील बातम्या