...आणि पेट्रोल आणखी महागणार!

पेट्रोलचे दर सध्या 80 रुपयांच्या घरात गेलेलं असताना यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2018 09:00 AM IST

...आणि पेट्रोल आणखी महागणार!

17 एप्रिल : पेट्रोलचे दर सध्या 80 रुपयांच्या घरात गेलेलं असताना यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल आता तब्बल 90 रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सध्या 72 डॉलर प्रतिबॅरल असलेलं क्रूड ऑईल 80 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होऊ शकते. त्यामुळे सर्वसामांन्यांच्या खिशाला कात्री लागणार इतकं नक्की.

असं असताना अमेरिका आणि युरोपियन युनियनने सीरियासह तेलउत्पादक देशांवर आर्थिक निर्बंध घातल्यानं ही स्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात महागाईचा जमाना येणार असं म्हणायल हरकत नाही.

आधीच अनेक जीएसटीमुळे देशाचे आर्थिक घोरण कोलमडलं आहे. त्याच्यात आता इंधनाचे दर वाढल्यानं प्रवासासह जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2018 09:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...