Home /News /national /

भयंकर! कैद्याने गुप्तांग कापून मंदिरात केलं अर्पण; कारण ऐकून पोलिसही झाले हैराण

भयंकर! कैद्याने गुप्तांग कापून मंदिरात केलं अर्पण; कारण ऐकून पोलिसही झाले हैराण

तो रडत असल्याचा आवाज ऐकून वॉर्डन घटनास्थळी हजर झाले. त्यावेळी हा कैदी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता

    ग्वालियर, 5 मे : हत्येच्या आरोपाखाली दोषी असलेल्या एका 25 वर्षीय कैद्याने मंगळवारी अत्यंत धक्कादायक पाऊल उचललं. या कैद्याने आपलं गुप्तांग कापलं आणि केंद्रीय तुरुंगातील आवारात असलेल्या मंदिरात अर्पण केलं. यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. ग्वालियर केंद्रीय तुरुंगाचे अधीक्षक मनोज साहू यांनी सांगितले की कैदीने सोमवारी रात्री स्वप्न पाहिलं. त्यानंतर त्यानं हे पाऊल उचललं. कैदीने सांगितले होतं की, स्वप्नात त्यांने शंकराला पाहिलं. या घटनेनंतर कैद्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. साहूंनी पुढे सांगितले की, जवळील भीण्ड जिल्ह्यात राहणारा विष्णू कुमार (25) खूनाच्या प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहे. कैदीने मंगळवारी सकाळी 6.30 वाजता तुरुंग परिसरातील शंकराच्या मंदिरात पूजा केली आणि तेथे गुप्तांग कापून अर्पण केलं. भगवान शंकरानेच असं करण्यास सांगितल्याने यावेळी कैद्याने सांगितले. यासाठी कैदीने चमच्याचा वापर केल्याचे अधीक्षकांनी सांगितले. त्यांनी सांगितलं की, विष्णू कुमार यांच्या रडण्याचा आवाज ऐकून वॉर्डन घटनास्थळी आले. तेथे त्यांनी कुमार हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिले. त्यानंतर तातडीने कुमारला रुग्णालयात हलविण्यात आले. सद्या विष्णू कुमारची प्रकृती गंभीर आहे. तो 2018 पासून ग्वालियरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. संबंधित-अहवालातून आलं अमेरिकेतील धक्कादायक वास्तव, एका दिवसात 3000 कोरोना बळींची शक्यता 'ते योद्धे होते, मी रडणार नाही'; शहीद आशुतोष शर्मा यांच्या पत्नीने दिला मुखाग्नी
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Crime

    पुढील बातम्या