पंतप्रधानांकडून पुन्हा एकदा कृषी कायद्याचं कौतुक; वाचा FICCI च्या सभेत काय म्हणाले नरेंद्र मोदी?

पंतप्रधानांकडून पुन्हा एकदा कृषी कायद्याचं कौतुक; वाचा FICCI च्या सभेत काय म्हणाले नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (एफआयसीसीआय) च्या 93 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (एजीएम) संबोधित केले.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (एफआयसीसीआय) च्या 93 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (एजीएम) संबोधित केले. पीएम मोदी यांनी या कार्यक्रमात बदलत्या भारताचे चित्र सादर केले. ते म्हणाले की, कोरोनामुळे ज्या प्रकारे देशाची परिस्थिती बिघडली त्या स्थितीत वेगाने सुधार झाला आणि आज भारताचे हे यश जग पाहात आहे. राष्ट्र उभारणीत फिक्कीचे मोठे योगदान आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, नवीन कृषी कायद्यामुळे शेती आणि त्यासंबंधातील विभागातील अडथळा दूर होईल. या नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन बाजारपेठा उपलब्ध होईल. सध्या भारतीय शेतकरी स्वत:चे उत्पादन बाजारात आणि बाहेरही विकू शकतो. याशिवाय विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरदेखील ते आपले उत्पादनाची विक्री करू शकतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे व त्यांना अधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही विविध प्रकारच्या योजना राबवित आहोत.

शनिवारी सकाळी आंदोलनकर्ते शेतकर्‍यांनी तीव्र निदर्शने केली होती. केंद्र सरकारशी होणारी चर्चा अनिश्चित झाल्याने शेतकऱ्यांनी  हरियाणामधील टोल प्लाझा बंद केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कृषी कायद्याचे कौतुक केले. या कार्यक्रमात ते म्हणाले की, नव्या कायद्यानंतर शेतकर्‍यांना नवीन बाजारपेठ तर मिळेलच नवीन पर्याय निर्माण होतील, तंत्रज्ञानाचा फायदा होईल. देशातील कोल्ड स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर आधुनिक होईल. सर्व कृषी क्षेत्रात अधिक गुंतवणूक होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थव्यवस्थेबाबत म्हणाले की आपल्या अर्थव्यवस्थेला विविध क्षेत्रांमध्ये अडथळा नाही तर एका पुलाची गरज आहे. ज्यामुळे एक क्षेत्र दुसऱ्याचं समर्थन करू शकेल. गेल्या अनेक वर्षांत या प्रकारचे अडखळे दूर करण्यासाठी आम्ही सुधारणा केली आहे. पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले की, एक योग्य व न्याय्य सरकारसाठी सर्व भागधारकांनी कौशल्यांचा उपयोग करण्याची व हातभार लावण्याची गरज आहे. भारतातील कॉर्पोरेट कर जगातील सर्वाधिक स्पर्धात्मक आहे. आम्ही अशा काही देशांपैकी एक आहोत ज्यांचे मूल्यांकन आणि अपील सुविधा पारदर्शक आहे. दोलायमान अर्थव्यवस्थेत जेव्हा एखादे क्षेत्र वाढते तेव्हा त्याचा इतर क्षेत्रांवरही थेट परिणाम होतो, असेही ते पुढे म्हणाले.

Published by: Meenal Gangurde
First published: December 12, 2020, 9:40 PM IST

ताज्या बातम्या