कॅमेऱ्याचा शौक लय भारी! फोटोग्राफरनं कॅमेऱ्याचं बांधलं घर, Canon आणि Nikon ठेवली मुलांची नावं

कॅमेऱ्याचा शौक लय भारी! फोटोग्राफरनं कॅमेऱ्याचं बांधलं घर, Canon आणि Nikon ठेवली मुलांची नावं

  • Share this:

मुंबई, 13 जुलै: प्रत्येकाची आयुष्यात इच्छा असते की आपल्याला आवडणाऱ्या वस्तूचं घर बनवावं. कुणाला चॉकलेटचं तर कुणाला बिस्कीटाचं तर कुणाला आणखीन काही. पण सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती कॅमेऱ्याच्या आकारात बांधलेल्या इमारतीची.

फोटोग्राफर रवि होंगल यांनी त्यांचं घर कॅमेऱ्याच्या डिझाइनमध्ये बांधलं आहे. त्यांच्या घराची सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चा सुरू आहे. कॅमेऱ्याचं चित्र आणि तसा आकार असलेलं घर असावं अशी होंगल यांची इच्छा होती. रवी हे कर्नाटकातील बेळगावचे रहिवासी आहेत. ते व्यवसायाने फोटोग्राफर आहेत. त्यांना लहानपणापासूनच फोटोग्राफीची आवड आहे. ते जसजसे मोठे होत गेले तसतशी त्याची फोटोग्राफीची आवड वाढत गेली. त्यांनी आपल्या घराची कॅमेरा सारखी रचनाही केली. दूरवरुन बघितले तर जणू एखादा कॅमेरा उभा आहे असा भास हे घर पाहिल्याक्षणी होतो.

हे वाचा-मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मारुती सुझुकीची कार रेलिंग तोडून उलटली VIDEO

रवी यांनी आपल्या मुलांचीही नाव कॅमेरावरून ठेवली आहेत. एकाचं नाव कॅनन तर दुसऱ्याचं नाव निकॉन असं ठेवलं आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की कॅमेऱ्याच्या आकारत हे घर दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 17 हजारहून अधिक लोकांनी पाहिला असून 67 लोकांनी लाईक केलं आहे. या घराची सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चा रंगली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 14, 2020, 8:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading