मृत व्यक्तीच्या घरी रुग्णालयातून गेला फोन; कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले, उद्या होईल डिस्चार्ज

मृत व्यक्तीच्या घरी रुग्णालयातून गेला फोन; कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले, उद्या होईल डिस्चार्ज

आपला रुग्ण जिवंत आहे की नाही याबद्दल त्याच्या कुटुंबीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

  • Share this:

अहमदाबाद, 01 जून : गुजरातमधील अहमदबादमध्ये कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलकडे पुन्हा एकदा अत्यंत दुर्लक्ष झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अहमदाबादच्या निकोले भागात राहणाऱ्या देवरामभाई भिसीकर या रूग्णाला कोरोना विषाणूच्या लक्षणांसह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारी त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली.

अंत्यसंस्कार करण्यापूर्वी कुटुंबाला रुग्णाचा चेहरा पाहण्याची परवानगी नव्हती. दुसर्‍याच दिवशी भिसीकर यांच्या घरी रूग्णालयातून फोन आला की, तुमचा रूग्ण बरा झाल्यामुळे सामान्य वॉर्डमध्ये हलविला जात आहे. त्यानंतर ते गोंधळात पडले. आपला रुग्ण जिवंत आहे की नाही याबद्दल त्याच्या कुटुंबीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

संपूर्ण कुटुंब गोंधळले

देवरामभाईंच्या कुटुंबीयांशी बोलताना ते म्हणाले की, देवरामभाई जिवंत आहेत की नाही आणि आम्ही अंत्यसंस्कार केले ती व्यक्ती कोण होती याविषयी अजूनही आम्ही संभ्रमात आहोत. कुटुंबातील मोठे जावई म्हणाले की, "28 तारखेला आमच्या नातेवाईकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुसर्‍याच दिवशी दुपारी अडीच वाजता त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. त्यानंतर आमच्यातील दोन सदस्यांनी दुपारी चार वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. आमचे संपूर्ण कुटुंब नंतर या दुःखद बातमीमुळे हादरुन गेलो होतो.

हॉस्पिटलच्या फोनमुळे झाला गोंधळ

दुसर्‍या दिवशी सकाळी रुग्णालयातून फोन आला की तुमच्या नातेवाईकची प्रकृती सुधारत आहे, म्हणून आम्ही त्यांना सामान्य वॉर्डमध्ये हलविले आहे. हे ऐकून प्रत्येकाला आश्चर्य वाटले की, आदल्या दिवशी आम्ही कोणावर अंत्यसंस्कार केले? हे ऐकून माझ्या सासूची प्रकृती खालावली, असे देवरामभाई यांचे जावई म्हणाले. सर्वकाही सांभाळत आम्ही ताबडतोब दवाखान्यात पोहोचलो आणि आमचा नातेवाईक कोठे आहे याची चौकशी केली. ज्याला रुग्णालयाने उत्तर दिले की तुम्ही काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला होता.

ते म्हणाले की, रुग्णालयाकडून उत्तर मिळाल्यानंतर आम्ही परत आमच्या घरी गेलो आणि काही वेळाने पुन्हा मला रुग्णालयातून कॉल आला की तुमच्या नातेवाईकाचा कोरोना अहवाल नकारात्मक आहे आणि त्याची प्रकृतीही ठीक आहे. दुसर्‍या दिवशी त्यांच्या कुटूंबाला सोडण्यात येईल, असे हॉस्पिटलमधून सांगण्यात आले. तेव्हा देवरामच्या जावयाने त्यांचा काल मृत्यू झाला असल्याचे कॉलवर सांगितले.

रुग्णालयाने आपली चूक मान्य केली

या संपूर्ण प्रकरणाबद्दल अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे संचालक डॉ. शशांक पांड्या म्हणाले की, देवरामभाई सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले  तेव्हा त्यांच्या शरीरातील शूगर जवळपास 500 च्या आसपास होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉ. पांड्या म्हणाले की, या पेशंटशी संबंधित संपूर्ण प्रक्रिया कोरोना रूग्ण म्हणून केली गेली, कारण त्यांचा कोरोना अहवाल अद्याप प्रलंबित आहे. देवरामभाईंचा अहवाल नकारात्मक असल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले. रुग्णालयाच्या वतीने हे मान्य केले गेले की या संपूर्ण प्रकरणात चुकीची माहिती पोहोचवली गेली होती.

हे वाचा-एअर इंडियाच्या पायलटांनी उड्डाणे रोखण्याची दिली धमकी, हे दिलं कारण..

First published: June 1, 2020, 8:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading