Home /News /national /

पगारकपातीनंतर Air India च्या 50 पायलटांना मोठा धक्का; दाखवला बाहेरचा रस्ता

पगारकपातीनंतर Air India च्या 50 पायलटांना मोठा धक्का; दाखवला बाहेरचा रस्ता

काही दिवसांपूर्वी पायटलांनी एअर इंडियाविरोधात मोठी पगार कपात केल्याचा आरोप केला होता

    नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : कार्मिक विभागाने (Personnel Department) रात्रीतून एअर इंडियाच्या अनेक पायलटांना (Air India Pilots) नोकरीवरुन काढून टाकले आहे. पायलटांव्यतिरिक्त अनेक क्रू मेंबर्स (Crew) चा करारही रिन्‍यू करण्यात आला नसून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. पायलटांनी आरोप केला आहे की कार्मिक विभागाकडून केलेली ही कारवाई अवैध आहे. त्यांनी या प्रकरणात एअर इंडियाच्या प्रबंधनांना हस्‍तक्षेप करण्याची मागणी केली आहे. इंडियन कमर्शियल पायलट्स एसोसिएशन (ICPA) यांनी एअर इंडियाचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक राजीव बंसल यांना याबाबत पत्र लिहिले आहे. दक्षिण क्षेत्रात 18 केबिन क्रू मेंबर्सच्या सेवा केल्या समाप्त  आईसीपीएच्या पत्रात म्हटले आहे की 50 पायलटांना कंपनीच्या सेवा नियमांच्या उल्लंघनाबाबत कार्मिक विभागाकडून  अवैध टर्मिनेशन लेटर मिळाले आहेत. संगटनाने एक ट्विटमध्ये म्हटले आहे की योग्य प्रक्रियेचा अवलंब न करता एका रात्रीतून त्यांच्या 50 पायलटांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. कोरोनासारख्या आजाराच्या वेळी देशाची सेवा करणाऱ्यांना हा जबरदस्त झटका आहे. याशिवाय सदर्न बेसमधील पाच वर्षांची नोकरी पूर्ण झालेली आहे, अशा अनेक क्रू मेंबर्स यांचा करार रिन्‍यू करण्यात आलेला नाही. सांगितले जात आहे की दक्षिण भागातील 18 केबिन क्रू यांच्या सेवा संपविण्यात आल्या आहेत. ऑपरेशन मॅन्युअल आणि सर्विस रूल्‍सविरोधात आहे हे टर्मिनेशन आयसीपीएने सांगितले की सेवा समाप्त झाल्यानंतर फ्लाइट ड्यूटी लावणे सुरक्षाबाबत गंभीर उल्लंघन मानलं जातं.  आयसीपीएने याची आठवण करुन दिली की नागरिक उड्डयन मंत्रालय आणि एअर इंडियाने विश्वास दिला होता की अन्य एअरलाइन्सच्या विरोधात एअर इंडिया आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला काढणार नाही. असोसिएशनने हेदेखील सांगितले की रात्रीतून टर्मिनेशन लेटर जारी करणे एअर इंडियाच्या ऑपरेशन मैनुअल व सेवा नियमांच्या विरोधात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Air india

    पुढील बातम्या