उपेंद्र कुमार, रांची 2 जुलै: डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका किडनीच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रांची जवळच्या जामताडा इथली ही घटना आहे. इथे डायलेसिस सेंटर चालविण्याची जबाबदारी PPP तत्वावर एका खासगी संस्थेला दिली आहे. मात्र इथे डॉक्टर घरीच बसून कंपाउंडरला सूचना देत होता. त्यामुळे डायलेसिस करताना एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सरकारने संजिवनी या संस्थेला डायलेसिस सेंटर चालविण्याची परवानगी दिली आहे. अशा सेंटरमध्ये डॉक्टरांची उपस्थिती आवश्यक असते. मात्र इथला डॉक्टर हा गेली तीन महिने सेंटरवरच आला नसल्याचं आढळून आलं आहे. तो घरीच बसून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कंपाउंडरला सूचना देत होता.
अशा सूचना देतानाच त्या पेशंटचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डायलेसिस करताना पेशंटची तब्येत बिघडण्याची शक्यता असते. अशा वेळी डॉक्टरांची उपस्थिती आवश्य असते. ही घटना घडल्यानंतर प्रचंड चर्चा झाली. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आहे.
रतन साधू असं त्या रुग्णाचं नाव होतं. डायलेसिस करताना इंजेक्शन करताना दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. इंजेक्शन देतांनाच रुग्ण बेशुद्ध झाला आणि नंतर त्याचा मत्यू झाल्याचं कंपाउंडरने म्हटलं आहे.
Coronavirus : कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी अमित शहांचे महामंथन
या घटनेने सगळ्याच व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. अशाच प्रकारच्या इतरही सेंटर्सवर डॉक्टर्स येतात किंवा नाही हे आता तपासलं जात आहे. त्यामुळे शंका निर्माण झाली असून रुग्णांमध्येही संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे.
आता राज्याचा आरोग्य विभाग घटनेची चौकशी करत आहे. मात्र डॉक्टरला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचीही टीका करण्यात येत आहे.