मराठी बातम्या /बातम्या /देश /'...तर असं समजणं हे मूर्खपणाचं ठरलं असतं', पंतप्रधान मोदी कोरोना आण लॉकडाऊनबद्दल स्पष्टच बोलले  

'...तर असं समजणं हे मूर्खपणाचं ठरलं असतं', पंतप्रधान मोदी कोरोना आण लॉकडाऊनबद्दल स्पष्टच बोलले  

दरम्यान सर्व्हेत असंही सांगण्यात आलं आहे की, भारतात जवळपास १८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते असल्याचं नाकारलं आहे.

दरम्यान सर्व्हेत असंही सांगण्यात आलं आहे की, भारतात जवळपास १८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते असल्याचं नाकारलं आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करावा लागला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून हा एकमेव मार्ग होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 24 मार्च : कोरोना काळ हा सर्वांसाठी खडतर काळ होता. ही वेगळी घटना नव्हती. भारत आधी या घटनेपासून दूर होता. पण आज जग हे खूप छोटे झाले आहे. प्रत्येक देशाची सीमा एकमेकांना जोडलेली आहे. मला असं वाटलं की, एखादी महामाऱ्यापासून आपण दूर राहू शकतो, पण असा विचार करणे हे मूर्खपणाचे ठरणार आहे, असं परखड मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.

नेटवर्क 18 च्या हिस्ट्री TV18 या वाहिनीवर कोरोनाच्या परिस्थितीवर 'द वायल - इंडियाज व्हॅक्सिन स्टोरी' हा माहितीपट येत आहे. या माहितीपटामध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपलं परखड मत मांडलं.

 

'कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करावा लागला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून हा एकमेव मार्ग होता. कारण, ‘जान है तो जहाँ है’ हे सोपं समीकरण होतं, हेच लोकांना पटवून सांगितलं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

'आम्हाला कल्पना होती, देशावर आर्थिक संकटं येतील, त्यामुळे आयात थांबू शकते. तरीही लोकांनी लॉकडाऊनच्या नियमाचं पालन केलं. भारतासारख्या देशामध्ये लॉकडाऊन व्यवस्थितपणे सांभाळलं गेलं, हे जगासाठी आर्श्चकारक आहे. जगातला कोणताही देश आपल्या नागरिकांनी त्या दिशेनं घेऊन जाऊ शकत नाही, असंही पंतप्रधान म्हणाले.

 

काय आहे ‘The Vial’?

 

60 मिनिटांच्या या डॉक्युमेंट्रीमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस महामारीमध्ये भारताने कसं यश मिळवलं, याबाबत सखोल माहिती दिली आहे.

 

पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीपासून सुरू झालेला हा प्रवास अब्जावधी कुप्या बनवण्यापर्यंत कसा पोहोचला? देशाच्या एवढ्या लोकसंख्येसाठी जगातल्या दोन सर्वाधिक प्रभावी लसी विक्रमी वेळेत कशा पूर्ण करण्यात आल्या? याची कहाणी द व्हायल या डॉक्युमेंट्रीमध्ये सांगण्यात आली आहे.

 

भारतातल्या अतिशय दूर्गम भागात आरोग्य कर्मचाऱ्यांनी शौर्याने लसी नागरिकांपर्यंत पोहोचवल्या. भारत सरकार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निर्धाराच्या केस स्टडीही द व्हायल डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

 

'द वायल - इंडियाज व्हॅक्सिन स्टोरी' मध्ये अनेक अनटोल्ड स्टोरी आहेत. यामध्ये लस उत्पादक असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला आणि भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा एला व्यतिरिक्त इतर देशांना लसीसाठी मदत करण्यासाठी वॅक्सिन मैत्री आणि CoWIN अॅप सारख्या भारताच्या उपक्रमांचा तपशीलही आहे.

 

 

First published:
top videos