नवी दिल्ली, 25 जून : दक्षिण दिल्लीतील 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद सफदरजंग यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते घरी परतले आहेत. त्यांनी 17 जून रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोलिसांनी यावेळी सांगितलं की, 81 वर्षीय प्रसाद हे दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून प्यायले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पोलीस उपायुक्त अतुल ठाकूर यांनी सांगितलं की, गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरी परतले असून आराम करीत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना अनेक जणं फोन करून यूट्यूबर गौरव वासन याची माफी मागण्यासाठी जबरदस्ती करीत आहेत. यामुळे ते वैतागले होते. आणि हे धक्कादायक पाऊल उचललं. तरी या प्रकरणात कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नाही.
यावर वासन म्हणाले की, कोण त्यांना फोन करून त्रास देत आहे, याबद्दल मला माहिती नाही. जेव्हा त्यांनी माध्यमांद्वारे माझी माफी मागितली त्यानंतर मी त्यांची भेट घेतली होती. त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कांता प्रसाद हे गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात चर्चेत आले होते.
हे ही वाचा-धक्कादायक!1 लाख 80 हजारांत सौदा;भाऊ असल्याचं सांगत पत्नीचं लावून दिलं दुसरं लग्न
लॉकडाऊनदरम्यान ढाब्यावर काम नसल्यामुळे ते त्रस्त झाले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर मात्र देशभरातून लोकांनी त्यांना पाठिंबा दिला व आर्थिक मदत केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर गौरव वासन यानेच शेअर केला होता. यानंतर मात्र प्रसादनी मदत मिळालेल्या पैशांचा दुरुपयोग केल्याचा आरोप वासनवर केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा गदारोळ उठला होता. मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं प्रसाद यांनी स्वत: माध्यमांसमोर येऊन सांगितलं होतं.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.