भारतातल्या COVID-19 रुग्णांची संख्या गेली 15 लाखांवर, जगात तिसरा क्रमांक

भारतातल्या COVID-19 रुग्णांची संख्या गेली 15 लाखांवर, जगात तिसरा क्रमांक

भारतात 5.10 लाख रुग्ण Active आहेत. तर 9.87 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 28 जुलै: भारतात (India)  कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संख्येत दररोज वाढ होत आहे. देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 15 लाखांवर गेली आहे. त्यामुळे भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. भारतानंतर अमेरिक (America)  आणि ब्राझिलमध्येच (Brazil)  कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. तर देशात आत्तापर्यंत 34 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात मंगळवारी रात्री 10 वाजेपर्यंत 49 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे Covid-19 रुग्णांची एकूण संख्या  15.31 लाख झाली आहे. तर 5.10 लाख रुग्ण Active आहेत. तर 9.87 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 34,224 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात मंगळवारी 10 हजार 333 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णाची संख्या अधिक आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात जास्त संख्या असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. (Covid-19 Patient) आज राज्यात 7 हजार 700 नवे रुग्ण आढळून आलेत. नवीन रुग्णांच्या संख्येत घट होतांना दिसत असली तरी मृत्यूचा आकडा मात्र कमी होत नाही.

जगात दुसऱ्यांदा होणार कोरोना व्हायरचा उद्रेक? तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

आज राज्यात 282 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारीही बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त होती. राज्यातल्या बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 59.34 एवढं झालं आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 3,91,440 एवढी झाली आहे.

जगात कोरोनाव्हायरसने विळखा घातला असून जगभरातले 190 पेक्षा जास्त देश संक्रमित झाले आहे. त्यामुळे सगळ्या देशांची परिस्थितीच बदलून गेली आहे.

जगात आत्तापर्यंत 1 कोटी 66 लाख 90 हजार 181 जणांना कोरोना झाला आहे. तर 1 कोटी 2 लाख 75 हजार 318 जण बरे झाले आहेत.

तर जगात 6 लाख 57 हजार 513 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. चीन, इटली, ब्राझील या देशात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र जगात पुन्हा कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

COVID-19: पावसाळ्यात या 10 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर होऊ शकते बाधा

मात्र असा अंदाज व्यक्त करणं योग्य नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. असा अंदाज बांधता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. University of Kent च्या व्हायरॉलॉजी विभागाचे प्रमुख जेरेम रॉसमॅन यांनी कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हणणं योग्य नसल्याचं सांगितलंय.

कोरोनाचीही साथ दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे. त्यावर औषध निघालेलं नाही त्यामुळे त्यात चढ उतार होत जाणार आहेत असा दावा त्यांनी केलाय.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 28, 2020, 11:42 PM IST

ताज्या बातम्या