कोरोना व्हायरस : भारतात वाढू लागली मृत्यूसंख्या, बाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ

कोरोना व्हायरस : भारतात वाढू लागली मृत्यूसंख्या, बाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ

देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 7 लाख 93 हजार 802 इतकी झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जुलै : देशावरील कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होऊ लागलं आहे. बाधित रुग्णांच्या संख्येसह कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. मागील 24 तासांमध्ये देशात तब्बल 26 हजार 506 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 7 लाख 93 हजार 802 इतकी झाली आहे.

दुसरीकडे, कोरोनामुळे आणखी 475 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 21 हजार 604 जणांनी कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमावला आहे. सध्या भारतात 2 लाख 76 हजार 685 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत 4 लाख 95 हजार 513 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

भारतातील कोरोना स्थितीबाबत धक्कादायक दावा

कोरोनाचे संक्रमण जगभरात वाढू लागले आहे. दरम्यान जगभरातील विविध संशोधन संस्था कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरात लवकर कोरोनावर लस न सापडल्यास 2021 मध्ये भारतात दररोज 2.87 लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील, असा दावा अमेरिकेतील एका संशोधनातून करण्यात आला आहे. अमेरिकेतील मेसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधील संशोधकांनी असा दावा केला आहे की, जर लवकरात लवकर कोरोनावर लस उपलब्ध नाही झाली तर दररोज कोरोनाचे किती पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतील. या संशोधकांच्या दाव्यामध्ये भारत अग्रकमावर आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 10, 2020, 10:36 AM IST

ताज्या बातम्या