कॉल ड्रॉपचं प्रमाण वाढण्याची शक्यता

कॉल ड्रॉपचं प्रमाण वाढण्याची शक्यता

खासगी टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपन्यांकडून एकूण ९५ कोटी ३८ लाख कनेक्शन देण्यात आली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या ३१ लाखांनी वाढलीय. राज्यातही मोबाईलधारकांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून नफेखोरी करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलेले नाही. या सगळ्यामुळे कॉल ड्रॉप वाढण्याची शक्यता आहे.

  • Share this:

 27 नोव्हेंबर: देशातील मोबाईलधारकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालीय. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या कंपनीनं नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेनुसार हे सिद्ध झालं आहे. मात्र, मोबाइल कनेक्शन वाढली, तरी कनेक्टिविटीचं काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. 'दर वर्षी सातत्यानं वाढत चाललेल्या मोबाइल कनेक्शनचा भार पेलण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांकडे उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान पुरेसे नाही. त्यामुळे कनेक्शन्स वाढली, तरी त्याचा फायदा होण्याऐवजी कॉल ड्रॉप्ससारख्या समस्या अधिकच वाढत जातील,' अशी भीती टेलिकॉम तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

खासगी टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपन्यांकडून एकूण ९५ कोटी ३८ लाख कनेक्शन देण्यात आली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या ३१ लाखांनी वाढलीय. राज्यातही मोबाईलधारकांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून नफेखोरी करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलेले नाही. या सगळ्यामुळे कॉल ड्रॉप वाढण्याची शक्यता आहे.

 

'सीओएआय'ने देशभर नुकताच एक सर्व्हे केला असून ऑक्टोबर महिन्यातील टेलिकॉम सबस्क्राइबरची ग्राहकसंख्या जाहीर केली आहे. या माहितीनुसार भारतातील एकाच टॉवरवर अनेक कंपन्यांची कनेक्शन्स कार्यरत असतात. अशा परिस्थितीत मोबाइलधारकांची वाढणारी आकडेवारी ही ग्राहकांनाच आणखी डोकेदुखी ठरू शकते. सध्या असलेल्या कनेक्शन्समध्ये अनेकदा अडथळे येत असल्याने कॉल ड्रॉप्स होत आहेत. त्यात आता आणखी नव्या मोबाइल कनेक्शन्सची भर पडली आहे.

'मोबाइलधारकांची वाढ झाल्याने देशाच्या कानाकोपऱ्यात मोबाइल कनेक्टिव्हिटी आणणे हा आमचा दृष्टिकोन आणि हेच आमचे ध्येय आहे, यामुळेच मोबाइलग्राहकाधार वाढावा यासाठी जास्तीत जास्त शहरांमध्ये आम्ही प्रोत्साहन देत आहोत. यामुळे डिजिटल इंडिया सबलीकरण आणि लोकांना पूर्णपणे जोडलेले राखण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश मिळेल,' असे सीओआयचे संचालक राजन एस. मॅथ्यू यांनी म्हटलं आहे.

टेलिकॉम कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान अपग्रेड केलेलं नाही.  मोबाइल कनेक्शन्स वाढली, तर त्याचा फायदा न होता कॉल ड्रॉप्सच्या समस्या अधिक वाढणार आहेत. मोबाइलधारकांची संख्या वाढवत असताना मोबाइल कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे गरजेचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 10:51 PM IST

ताज्या बातम्या