जयपुर, 19 सप्टेंबर : एकीकडे देशात कोरोना संसर्गाचा धोका जलद गतीने वाढत आहे. यादरम्यान भारतीय हवाई सेवाकडून निष्काळजीपणा केल्याची बाब समोर आली आहे. येथे एअर इंडियाची फ्लाइट एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने जयपूर ते दुबई असा प्रवास केला आहे. दुबई एअरपोर्ट प्रशासनाने अंतर्गत तपासानंतर एअरलाइन्सच्या सर्व ऑपरेशनन्स तातडीने थांबविल्यानंतर याचा खुलासा झाला.
आता 15 दिवसांसाठी आणली बंदी
4 सप्टेंबर रोजी एअर इंडिया एक्सप्रेसची फ्लाइट आयएक्स-1135 जयपुरहुन दुबईला जाणार होती. यामध्ये दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असलेला एक व्यक्ती कर्तार सिंह याला फ्लाइटमधून दुबईला जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र दुबई प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी दिलेल्या आदेशानंतर 2 ऑक्टोबरपर्यंत एअर इंडिया एक्सप्रेसची देशभरातील कोणतीही फ्लाइट दुबईला जाऊ शकणार नाही.
हे ही वाचा-पाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी
फ्लाइटमधून उतरण्याची परवानगी नाकारली
हे प्रकरण समोर आल्यानंतर दुबई एअरपोर्ट प्रशासनाने कडक नियम लावत सर्व एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटवर बंदी आणली. र दुपारी 2 वाजता जयपुरहून 65 प्रवाशांसह फ्लाइट दुबईसाठी रवाना झाली होती. दुबई एअरपोर्ट प्रशासनाने या फ्लाइटला उतरण्याची परवानगी दिली नाही. यानंतर सायंकाळी 5 वाजता फ्लाइट शारजाहमध्ये लँड करण्यात आली. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
दरम्यान 2020 हे वर्ष प्रत्येकासाठीच वाईट ठरलं. याचं कारण म्हणजे कोरोनाची महासाथ (corona pandemic). कोरनाव्हायरसच्या (coronavirus) भीतीने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. संक्रमणावर नियंत्रण राहावं यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केला. लोक घरात बंदिस्त झाले, कित्येकांच्या नोकऱ्या-रोजगार गेला. या सर्वाचा परिणाम लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही होऊ लागला. त्यामुळे कधी एकदाचा का कोरोना जातो? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. सोशल मीडियावर यावर बरेच मिम्सही व्हायरल होऊ लागले होते. प्रत्येकाच्या मनात असलेल्या या प्रश्नाचं उत्तर अखेर तज्ज्ञांनी दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Air india, Coronavirus