Home /News /national /

लवकरच उघड होणार सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य,सरकारनं मान्य केल्या 3 अटी

लवकरच उघड होणार सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य,सरकारनं मान्य केल्या 3 अटी

लवकरच नेतेची सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूचं खरं रहस्य समोर येणार आहे. सुभाष चंद्र बोस यांचा मुलगा सोमनाथ बोस यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यू्च्या रहस्यावरून पडदा उठवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
    गोरखपूर, 25 जानेवारी: लवकरच नेतेची सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं खरं रहस्य समोर येणार आहे. सुभाषचंद्र बोस यांचा मुलगा सोमनाथ बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यू्च्या रहस्यावरून पडदा उठवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्र सरकरानं त्यांची  मागणी मान्य केली आहे. त्यामुळं लवकरच आता केंद्र सरकार सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूप्रकरणी सकारात्मक पाऊल उचलणार आहे. त्यामुळं सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर येण्याची शक्यता आहे. सोमनाथ बोस यांची मागणी केंद्राकडून मान्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्य कधी आणि कसा झाला याविषयी अजूनही अनेक मतमत्तातरे आहे. त्यामुळं सुभाषचंद्र बोस यांचा मुलगा सोमनाथ बोस यांनी मोदी सरकारकडे सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं खरं कारण उघड करण्याची विनंती केली होती. त्यासाठी त्यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसं पत्रच बोस कुटुंबीयांनी मोदी सरकारला दिलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारनं त्यांच्या मागणीची दखल घेऊन लवकरच सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचं केंद्र सरकारनं त्यांना आश्वासन दिलं. तशी माहिती सोमनाथ बोस यांनी पत्रकारांना दिली आहे. सोमनाथ बोस यांच्या तीन मागण्या मान्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मुलगा सोमनाथ बोस यांनी केंद्र सरकारकडे पाच मागण्या केल्या होत्या. सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या रहस्यावरून पडदा उठवण्याच्या मागण्यासह पाच मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यांच्या पाच पैकी तीन मागण्या केंद्र सरकारनं मान्य केल्या आहेत. त्यापैकी एक मागणी म्हणजे सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या रहस्यावरून पडदा उघडणे. त्यांची ही मागणी केंद्र सरकारनं मान्य केली आहे. तसेच सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन भव्यदिव्य स्वरुपात साजरा करण्याची मागणीही केंद्र सरकारनं मान्य केली आहे. गुमनामी बाबा सुभाष चंद्र बोस नाही गुमनामी बाबा हे सुभाषचंद्र बोस असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. अनेकांनी तर गुमनामी बाबाचं सुभाषा बाबू असल्याचं मानलं होतं. मात्र गुमनामी बाबा सारखे व्यक्ती कधीच सुभाषचंद्र बोस होऊ शकत नाही असं सोमनाथ बोस म्हणाले. कोणत्याही नावाशिवाय राहणं कधीच सुभाषचंद्र बोस यांनी पसंद केलं नाही. आपलं म्हणण रोखठोकपणे सुभाषचंद्र बोस मांडत होते. निर्भिडपणे त्यांनी आपली भूमिका जगजाहीर केली. ते जर सुभाषचंद्र बोस असते तर त्यांनी पुढे येऊन त्याचा खुलासा केला असता. त्यामुळं कोणत्याही गुमनामी बाबाला सुभाष चंद्र बोस म्हणणं चुकीचं असल्याचं सोमनाथ बोस म्हणाले. DNA जुळला नाही गुमनामी बाबा हेचं सुभाषचंद्र बोस असल्याच्या चर्चा रंगत होत्या. त्यामुळं बोस कुटुंबीयांचं आणि गुमनामी बाबाचं डीएनए टेस्ट करण्यात आलं. एकदा नव्हे तर चारदा डीएनए टेस्ट करण्यात आलं. पण डीएनए टेस्ट जुळलं नाही. त्यामुळं गुमनामी बाबा हे सुभाषचंद्र बोस होते असं म्हणण्याला काहीही अर्थ नसल्याचं सोमनाथ बोस यांनी म्हटलंय.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Boses death news, Death mystery news, Death mystery revealed

    पुढील बातम्या