श्रीनगर, 21 जून : जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सने दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करावे, यासाठी अनेक प्रयत्न केले. तीन दहशतवाद्यांच्या नातेवाईकांना पाचारण करण्यात आले. या नातेवाईकांकडून दहशतवाद्यांना भावनिक साद घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र यात पोलिसांना यश आले नाही. अखेरीस शहराच्या जूनीमर परिसरात पोलिसांना अखेरीस दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घ्यावी लागली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांविरोधातली ही मोहीम शनिवारी रात्री सुरु करण्यात आली, त्यात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं. तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटविण्यात आली असून शकूर फारुक लंगू हा भरथान्याचा रहिवासी होता. तर शाहीद अहमद भट हा सेमनाथ बिजबेहराचा रहिवासी आहे. तिसरा दहशतवादी सौरा परिसरातील रहिवासी होता. बंदी असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनशी या तिन्ही दहशतवाद्यांचा संबंध असल्याचेही तपासात समोर आले आहे.
दहशतवाद्यांना भावनिक अपील करुन शरणागतीसाठी तयार करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर, दाट लोकसंख्या असलेल्या भागात स्थानिकांचा जीव वाचविण्यासाठी कारवाई सुरु केली. यात तिन्ही दहशतवादी मारले गेले. रमजानच्या काळात सौरा भागात बीएसएफच्या दोन जवानांच्या हत्येच्या कटात या दहशतवाद्यांचा समावेश होता, अशीही माहिती समोर येते आहे. एका घरात लपून बसलेल्या या दहशतवाद्यांना टास्क फोर्सने घेरले होते. शनिवारी रात्रभर सुरु असलेल्या या कारवाईत पोलीस अधीक्षक ताहिर भट्ट यांनी दहशतवाद्यांना वारंवार शरणागतीचे आवाहन केले होते, मात्र दहशतवाद्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करावे म्हणून बोलाविले मातापित्यांना
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांना रात्रीच घेरण्यात आले होते, स्थानिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये हे पोलिसांचे पहिले ध्येय होते. या घराचे मालक आणि परिसरात राहणाऱ्यांना घरातून काढून सुखरुप ठिकाणी नेण्यात पोलिसांना यश आले.
हे वाचा-
चहा विकणाऱ्याच्या मुलीने स्वप्न केलं पूर्ण; फ्लाईंग ऑफिसर बनून आकाशात घेतली झेप मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.