Home /News /national /

प्रियांका गांधींच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडली हाथरस पीडितेची आई; पाहा VIDEO

प्रियांका गांधींच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडली हाथरस पीडितेची आई; पाहा VIDEO

अखेर आज राहुल व प्रियांका गांधी यांनी हाथरस पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली

    हाथरस, 3 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करीत तिची हत्या करण्यात आली. यानंतर मात्र देशभरात याचे पडसाद उमटले आहेत. आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काल कुटुंबीयांची भेट घेण्यापासून राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना मज्जाव करण्यात आला होता. आज अखेर त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केलं. यावेळी अत्यंत दु:खात असलेल्या त्या कुटुंबीयांसोबत राहुल व प्रियांका गांधी यांनी बातचीत केली. यावेळी हाथरस प्रकरणातील पीडितेच्या आईने प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर डोकं ठेवून आपलं दु:ख व्यक्त केलं. यावेळी त्या ढसाढसा रडल्या. मुलीला इतक्या क्रुरपणे मारण्यात आले व त्यानंतर तिचं शेवटचं दर्शनही घेता आले नसल्याने कुटुंबीय अत्यंत भावूक झाले. कुटुंबीयांकडून मुलीच्या न्यायाची मागणी केली जात आहे. राहुल व प्रियांका गांधी यांनाही याबाबत कडक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरस  (Hathras) सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावरून एकीकडे राजकीय वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी पीडितेच्या गावाच्या सीमा बंद केल्या आहे. या परिस्थितीत पीडितेच्या भावाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. पीडित कुटुंबीयांचे सांत्वन आणि भेट घेण्यासाठी राजकीय पक्ष हाथरसमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. पण, उत्तर प्रदेश पोलीस आणि  हाथरस जिल्हा प्रशासन (Hathras District Administration) ने पीडितेच्या गावाला गेल्या 3 दिवसांपासून कडक पहारा लावला आहे. पीडितेचे कुटुंब गेल्या 3 दिवसांपासून घरात अडकून पडले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Priyanka gandhi, Rahul gandhi, Uttar pradesh

    पुढील बातम्या