Home /News /national /

शहीद मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आईने सोडले प्राण!

शहीद मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आईने सोडले प्राण!

सियाचीन सारख्या युद्धभूमीवर जिथे निसर्गाचं राज्य चालतं, तिथे श्वास सुद्धा त्याच्या मर्जीने घ्यावा लागतो अशा ठिकाणी बहादुर जवान आपला जीव मुठीत धरून खडा पहारा देता

    हमीरपूर, 01 जानेवारी : पोटच्या मुलाच्या जाण्याचे दु:ख जन्मदात्या आई-वडिलांपेक्षा जास्त कुणालाही नसतं. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या जवानाला शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पण, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आईने प्राण सोडल्याची  ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलाचे जाण्याचे दु:ख त्यांना सहन झाले नाही. विमला देवी (वय 55) असं या माऊलीचं नाव आहे. त्यांचा शहीद मुलगा वरुण कुमार शर्मा (34) सियाचीनमध्ये धारातीर्थ झाला होता.  सियाचीन ही जगातली सर्वात मोठी युद्धभूमी आहे. इथं वजा शुन्य 50 डिग्री इतके तापमान असते. हमीरपूरचे जवान वरूण कुमार शर्मा  सियाचीन ग्लेशियर इथं देशाच्या रक्षणासाठी तैनात होते. 20 डिसेंबर रोजी सियाचिन ग्लेशियर इथं वरूण शर्मा कर्तव्य बजावत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली. अचानक डोकेदुखी वाढली आणि रक्ताची उलटी झाली. त्यानंतर त्याच दिवशी त्यांच्यावर तातडीने ऑपरेशनही करण्यात आलं. त्यानंतर चंडी मंदिर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. नऊ दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर मागील रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास वरूण शर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वरूण शर्मा यांचं पार्थिव त्यांच्या मुळगावी दुलेडा इथं नेण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर मंगळवारी शासकीय सन्मानपूर्वक अंतिम निरोप देण्यात आला. वरूण शर्मा यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वीच वरूण शर्मा यांचा मुलगा अमर नाथ हा दो डोगरा रेजिमेंटमध्ये सहभागी झाला  होता. मुलाच्या जाण्यामुळे त्यांच्या आई विमला देवी यांना दुखद धक्का बसला होता. मुलाच्या मृत्यूचे दु: ख त्यांना सहन झाले नाही अखेर दुसऱ्या दिवशी त्यांनीही प्राण सोडले. शर्मा कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सियाचीन युद्धभूमी! भारतीय जवान सीमेवर आपल्या जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण करता. पण, सियाचीन सारख्या युद्धभूमीवर जिथे निसर्गाचं राज्य चालतं, तिथे श्वास सुद्धा त्याच्या मर्जीने घ्यावा लागतो अशा ठिकाणी बहादुर जवान आपला जीव मुठीत धरून खडा पहारा देता. उणे 50 सेल्सिस तापमान, 19,500 फूट उंचावर सर्वसामान्यांना तग धरणे कठीणच. पण, अशा या प्रतिकुल परिस्थितीत आपले जवान जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत असतात. नोव्हेंबर 2018 महिन्यात हिमकडा कोसळून इथं 4 जवानांचा मृत्यू ओढवला होता. तर 2 नागरिकांचाही जीव गमवावा लागला होता. ही घटनाही 19 हजार फूट उंचीवर घडली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या