मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोदी सरकारला 8 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच मिळाला दिलासा, कारणही आहे तसच भारी!

मोदी सरकारला 8 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच मिळाला दिलासा, कारणही आहे तसच भारी!

महाराष्ट्राचे केंद्र सरकारकडे तब्बल 38 हजार कोटी रूपये बाकी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

महाराष्ट्राचे केंद्र सरकारकडे तब्बल 38 हजार कोटी रूपये बाकी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

महाराष्ट्राचे केंद्र सरकारकडे तब्बल 38 हजार कोटी रूपये बाकी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

  • Published by:  Ajay Kautikwar

नवी दिल्ली 01 नोव्हेंबर: गेल्या 8 महिन्यांपासून देश कोरोनाविरुद्ध (Coronavirus) लढाई लढतो आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तब्बल 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ देशात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला होता. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. व्यवहारच बंद असल्याने उत्पादन आणि उत्पन्नही बंद होतं. सरकारची तिजोरी खाली झाली होती. आरोग्यावरचा वाढता खर्च आणि घसरलेलं उत्पन्न त्यामुळे आर्थिक गाडा खिळखिळा झाला होता. मात्र आता व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. गेल्या 8 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच सरकारच्या तिजोरीत 1 लाख कोटींपेक्षा जास्त महसूल जमा झाला आहे.

GSTचा महसूल हा थेट केंद्र सरकारकडे जमा होतो आणि नंतर तो राज्यांना मिळतो. आता केंद्राकडेच पैसे नसल्याने राज्यांच्या तिजोऱ्याही खाली झाल्या होत्या. त्यामुळे कर्मऱ्यांचे वेतन द्यायलाही सरकारकडे पैसे नव्हते.

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापेक्षा या वर्षी 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी 1 लाख 5 हजार 155 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहेत. कारखाने बंद राहिल्याने देशाचा विकासदर तळाशी गेला आहे. हे वर्ष असेच राहणार असून 2021 मध्ये देश पूर्वीचाच विकासदर गाठेल अशी आशा अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केली होती.

काय सांगता! मोदी सरकार देणार तुमच्या मुलीच्या लग्नासाठी 40 हजार? वाचा सत्य

सरकारच्या तिजोरीत पैसेच नसल्याने केंद्र सरकार राज्यांनाही त्यांच्या वाट्याचे पैसे देऊ शकले नाही. त्यामुळे महाराष्ट्रसह अनेक राज्यांनी केंद्राकडे पैशासाठी तगादा लावला आहे. महाराष्ट्राचे केंद्र सरकारकडे तब्बल 38 हजार कोटी रूपये बाकी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

कोरोनामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येतो आहे. सगळ्या विकास कामांवर त्याचा परिणाम झाला आहे. तर नव्या योजना बंद झाल्या आहेत. आता व्यवहार सुरू झाल्याने थोडी परिस्थिती सुधारली असून सरकारलाही दिलासा मिळाला आहे. कोरोनावर लस आली तरत्यावरही सरकारचा प्रचंड मोठा खर्च होणार आहे.

...आणि भरसभेत भाजप नेते ज्योतिरादित्य म्हणाले, 'पंजासमोरील बटन...', Video व्हायर

लशीकरणावर तब्बल 80 हजार कोटींचा खर्च येणार असून त्याचा आरोखडा तयार करण्यात  येत आहे. त्यामुळे महसूल कसा वाढवायचा याचा केंद्र सरकार विचार करत आहे.

First published:

Tags: GST, Narendra modi