आयसोलेशन वॉर्डातून बेपत्ता झालेला मजूर गावभर फिरला, कोरोना रिपोर्ट आल्यानंतर प्रशासन हादरलं

आयसोलेशन वॉर्डातून बेपत्ता झालेला मजूर गावभर फिरला, कोरोना रिपोर्ट आल्यानंतर प्रशासन हादरलं

इतकंच नाही तर तो बँकेतून पैसे काढण्यासाठी गेला आणि सलूनमध्येही गेला. तर पुढील 2 दिवस तो गावभर फिरत होता.

  • Share this:

हाजीपूर, 27 मे : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. अशावेळी सरकारने लागू केलेल्या नियमांचा अवलंब करणे आवश्यक आहे. तर अनेक ठिकाणी प्रशासनाकडूनही हलगर्जीपणा होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वैशालीतील लालगंजमधील कोरोना रुग्णाने पळ काढल्याची बाब समोर आल्यानंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवलं जात आहे. ही घटना लालगंज भागातील आहे. येथे क्वारंटाईन सेंटर एबीएस कॉलेजमध्ये राहणाऱ्या प्रवासी मजुराचा रिपोर्ट 23 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

त्याच्यासोबत राहणाऱ्या सर्व 8 अन्य प्रवास मजुरांना हाजीपुरातील आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठविण्याचे सांगण्यात आले. मात्र त्यापैकी एक प्रवासी मजूर आयसोलेशन वॉर्डातून पळाला.

आयसोलेशन वॉर्डातून पळाल्यानंतर आपल्या घरी गेला. इतकंच नाही तर तो बँकेतून पैसे काढण्यासाठी गेला आणि सलूनमध्येही गेला. तर पुढील 2 दिवस तो गावभर फिरत होता. मात्र प्रशासनाला याबाबत काहीच माहिती नव्हती. तर दुसरीकडे गावकऱ्यांनी याबाबतचा पुरावाही प्रशासनासमोर सादर केला आहे.

प्रशासन हादरलं

जेव्हा गायब झालेल्या प्रवासी मजुरासह आयसोलेशन वॉर्डमधील सर्व 8 प्रवासी  मजुरांचा 25 मे रोजी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन हादरलं. त्यानंतर आयोसेलेशन वॉर्डमधून बेपत्ता झालेल्या मजुराला शोधण्यासाठी धावाधाव सुरू झाली. विशेष म्हणजे आयसोलेशन वॉर्डमधून एक मजूर बेपत्ता झाला होता व प्रशासनाला याबाबत माहिती नव्हती. रिपोर्ट आल्यानंतर ते जागे झाले.

हे वाचा -गावाला मिळाला दहा लाखांचा पुरस्कार, आता समोर आली धक्कादायक माहिती!

गोव्यात प्रवेश करण्यासाठी जारी केला नवा नियम; अन्यथा ‘नो एन्ट्री'

कोरोना व्हायरसबद्दल नवीन माहिती समोर, संशोधकांनी केला आश्चर्यकारक दावा

First published: May 27, 2020, 5:21 PM IST

ताज्या बातम्या