मैत्रिणीचा फोन आला म्हणून घराबाहेर पडली होती अल्पवयीन मुलगी, त्यातच 3 नराधमांनी साधला डाव

मैत्रिणीचा फोन आला म्हणून घराबाहेर पडली होती अल्पवयीन मुलगी, त्यातच 3 नराधमांनी साधला डाव

लॉकडाऊनमध्ये कोणी नसल्याची संधी साधत त्या तीन नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला

  • Share this:

नवादा, 29 एप्रिल : बिहारच्या नवादा येथे लॉकडाऊनदरम्यान एका अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बलात्काराची (Rape) ही घटना कादिरगंज पोलीस स्टेशन परिसरातील एका खेड्यातील आहे. मध्यरात्रीनंतर गावातील तीन तरुणांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले जात आहे. या कामात आरोपीबरोबर आणखी दोन तरुणही होते.

कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुलीच्या एका मैत्रिणीने तिला रात्री उशिरा फोन केला आणि भेटायला बोलावलं.   त्यानंतर ही घटना समोर आली. पीडित मुलीच्या कुटूंबाच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या आजीचे मानसिक संतुलन ठीक नाही. ती घराबाहेर गेली होती. यामुळे मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घराच्या दाराजवळ जाऊन उभी राहिली. तेव्हाच तिथे आधीपासून हजर असलेल्या तीन तरुणांनी तिला पकडले आणि जवळच गोठ्यात तिला घेऊन गेले.

तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर सर्व तरुण फरार झाले. या प्रकरणात एफआयआर नवादा महिला पोलीस स्टेशनमध्ये दाखल केले आहे. यामध्ये तीन तरुणांची नावे आहेत आणि दोन अज्ञात व्यक्तींवर एफआयआर नोंदविण्यात आला आहे ज्याला पीडित मुलगी ओळखत नाही.

याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महिला पोलीस स्टेशन अधिकारी राणी बबिता यांनी दिली. एफआयआर नोंदवून तरुणांना अटक करण्यासाठी गावात छापेमारी सुरू आहे. यासाठी सहाय्यक पोलीस स्टेशन कादिरगंजची मदत घेतली जात आहे. त्याचबरोबर एफआयआर नोंद झाल्यानंतर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सदर रुग्णालय नवादा येथे पाठविण्यात आले आहे. सध्या या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

संबंधित-लॉकडाऊनमध्ये चांगली बातमी! देशातील बेरोजगारीचा दर झाला कमी, काय आहेत कारणं?

First published: April 29, 2020, 5:49 PM IST

ताज्या बातम्या