काँग्रेस-भाजपच्या वादात जखमी जवानाची होरपळ, राहुल गांधींविरोधात वक्तव्यानंतर कुटुंब झालं बेपत्ता

काँग्रेस-भाजपच्या वादात जखमी जवानाची होरपळ, राहुल गांधींविरोधात वक्तव्यानंतर कुटुंब झालं बेपत्ता

गलवान घाटीत चिनी सैन्यांविरोधात झालेल्या चकमकीत हा जवान लढत होता. यामध्ये ते जखमी झाले आहे.

  • Share this:

अलवर, 21 जून : लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक चकमकीत जखमी झालेल्या अलवर जिल्ह्यातील नौगाव येथील झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या व्हिडीओमध्ये गलवानमध्ये चिनी सैन्यासोबत लढताना जखमी झालेल्या सुरेंद्र यांचे वडील बलवंत सिंह यांनी राहुल गांधींना शहिदांवर  राजकारण करू नका, असं वक्तव्य केलं होतं. यावर पुन्हा प्रत्युत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की शूर सैनिकांच्या वडिलांनी राहुल गांधींसाठी एक स्पष्ट संदेश दिला आहे.

दरम्यान सुरेंद्र सिंह यांचे वडील बलवंत सिंह बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. नौगावचे स्टेशन प्रभारी महानसिंह म्हणाले की, मी बलवंत यांच्या घरी गेलो होतो पण ते सापडले नाही. रामगड उपविभाग अधिकारी यांनाही जवानाच्या कुटुंबाविषयी माहिती नाही. व्हिडीओमध्ये बलवंत म्हणाले की, भारतीय सैन्य ही चीनला पराभूत करू शकेल. भारत इतर देशांनाही हरवू शकते. राहुल गांधींनी नेतागिरी करू नये. हे राजकारण चांगलं नाही. माझा मुलगा देशासाठी लढत आहे. यापुढेही लढत राहिल. देवाच्या कृपेने सर्व ठीक होईल व तो पुन्हा लढेल.

गलवानमध्ये भारतीय आणि चिनी सैन्याच्या चकमकीनंतर जखमी सैनिक सुरेंद्रसिंह यांचे वडील बलवंतसिंह यांच्या विधानाच्या व्हिडीओसह भाजप आणि कॉंग्रेस समोरासमोर आले आहेत. या दरम्यान, बलवंत सिंह रात्रीपासून आपल्या घरातून बेपत्ता आहेत. राजस्थानचे कॉंग्रेस सरकार बलवंतसिंग यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप केला जात आहे, ज्यामध्ये बलवंत सिंग यांनी राहुल गांधी यांना गलवानच्या संघर्षावर राजकारण न करण्याचा सल्ला दिला, त्यातच कॉंग्रेसचा आरोप आहे की, बलवंत सिंह यांच्याकडून हे विधान भाजपने जबरदस्तीने वदवून घेतले झाले.

बलवंतसिंग दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते की, चिनी सैनिकांची संख्या जास्त आहे आणि त्यांनी लोखंडी रॉडने हल्ला केला होता, त्यात भारतीय सैनिक निशस्त्र होते. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना हा व्हिडीओ ट्वीट करून उत्तर मागितलं होतं. दरम्यान, शनिवारी बलवंत सिंह यांच्या दुसर्‍या विधानाचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामध्ये बलवंत सिंह यांनी राहुल गांधी यांना या प्रकरणात राजकारण करू नये असा सल्ला दिला.

हे वाचा -ट्रम्प भारतीयांना झटका देण्याच्या तयारीत; तंत्रज्ञान क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम

 

 

संपादन - मीनल गांगुर्डे

 

First published: June 21, 2020, 3:53 PM IST

ताज्या बातम्या