CAA दिल्लीत पुन्हा उडाला भडका, निदर्शकांनी पेटवली पोलीस चौकी

CAA दिल्लीत पुन्हा उडाला भडका, निदर्शकांनी पेटवली पोलीस चौकी

राजधानीत दिल्लीत उडालेला भडका शांत होण्याचं काही नाव घेत नाहीये. सोमवारी झालेल्या राड्यानंतर आज मंगळवारीही भडका उडाला.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 17 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राजधानीत दिल्लीत उडालेला भडका शांत होण्याचं काही नाव घेत नाहीये. सोमवारी झालेल्या राड्यानंतर आज मंगळवारीही भडका उडाला. सिलमपूर परिसरात प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी पोलीस चौकी जाळली. सोबतच पोलीसांनी उभारलेले अडथळे तोडून त्यालाही आगी लावल्या. काही बाईक्सही जाळण्यात आल्या त्यामुळे अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आलंय. जामिया मीलीया विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणानंतर विद्यार्थ्यांचा उद्रेक जास्तच प्रमाणात बाहेर पडला. त्याचं लोन देशभर पसरलंय. देशातल्या अनेक राज्यांमध्यल्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चे काढून आपला निषेध व्यक्त केला.

तर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन गोळीबारात जखमी झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र पोलिसांनी गोळीबार केलेला नाही असं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर रिकाम्या गोळ्या सापडल्याचा दावाही पोलिसांनी केलाय.

निर्भया केस: सरन्यायाधीश बोबडेंनी या कारणांमुळे सुनावणीतून घेतली माघार

पोलिसांचा धक्कादायक खुलासा

जामिया विद्यापीठात पोलिस आणि विद्यार्थी यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीनंतर आता दिल्ली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. जामिया मिलिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यात काही विद्यार्थी जखमी झाले होते. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी दहा जणांना अटक केली असून यात एकही विद्यार्थी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, दिल्लीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त कुमार ज्ञानेश यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आंदोलक पुर्वतयारी करून आंदोलनात उतरले होते. त्यांच्याकडे भिजलेली ब्लँकेट होती. अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडताच त्यावर टाकण्यासाठी त्यांचा वापर आंदोलकांनी केला. आंदोलन शांततेनं होतं तर मग ब्लँकेट भिजवून कसं काय आणलं याचा तपास केला जात आहे. हे नक्कीच उत्स्फुर्तपणे नव्हतं तर सर्वकाही पुर्वनियोजित होतं असं ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे.

अभिमानास्पद...महाराष्ट्राचे सुपुत्र होणार देशाचे लष्करप्रमुख

 दरम्यान, जामिया मिलिया इस्लामिया प्रकरणी याचिकांवर सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून संबंधितांना उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी याचिकेवर सुनावणी झाली यावेळी सरन्यायाधीस एस एस बोबडे यांच्या पीठाने याचिकाकर्त्यांना विचारले की, तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात का आलात उच्च न्यायालयात का गेला नाहीत?

Published by: Ajay Kautikwar
First published: December 17, 2019, 4:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading