मेकअप केला म्हणून मास्कचं लावला नाही; नवरीचे नखरे पडले महागात

मेकअप केला म्हणून मास्कचं लावला नाही; नवरीचे नखरे पडले महागात

सर्वांना कोविड नियमावलीचं पालन करावं, असं वारंवार सांगूनही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

  • Share this:

हरियाणा, 21 एप्रिल : चंडीगडमध्ये बुधवारी रामनवमीवर एक दिवसाचा लॉकडाऊन लावला होता. यादरम्यान पोलिसांनी कडक नियमावली लावली आहे. सेक्टर-8/9 च्या लाइट प्लॉटवर कारमध्ये बसलेल्या नवरीने मेकअप खराब होण्यापासून वाचवण्यासाठी मास्क लावला नव्हता. मास्क न लावणं नवरीला महागात पडलं आहे. त्यानंतर चंडीगड पोलिसांनी ती गाडीच थांबवली आणि विना मास्क असल्याने एक हजार रुपयांचं चालान कापण्यात आलं. यावेळी नवरीच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी तिच्या मेकअपचं कारण दिलं. मेकअप बिघडेल म्हणून मास्क लावला नसल्याचं यावेळी पोलिसांना सांगण्यात आलं. मात्र पोलिसांनी त्यांचं ऐकून घेतलं नाही आणि कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं कारण सांगून चालान कापण्यात आलं.

हे ही वाचा-बीडमध्येही ऑक्सिजन बंद झाल्याने 6 जणांचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयावर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बुधवारी दुपारी घडलं आहे. सेक्टर 3 ठाण्यात तैनात एएसआय जितेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात सेक्टर 8/9 च्या नाक्यावर बंदोबस्त लावण्यात आला होता. यादरम्यान तेथून एक कार गेली. नवरीला गुरुद्वाऱ्यात घेऊन जाणाऱ्या त्याच्या भावाने सांगितलं की, मेकअप असल्याकारणाने नवरीने मास्क लावला नाही. मास्क लावला असता तर नवरीचा मेकअप खराब होईल.

त्यामुळे तिला ड्रायव्हरच्या सीटच्या शेजारी बसविण्यात आलं होतं. मात्र मास्क लावला नव्हता. तर या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, नियम सर्वांसाठी समान आहेत. यातून कोणाचीही सुटका होणार नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: April 21, 2021, 7:12 PM IST

ताज्या बातम्या