Home /News /national /

विवाहितेला फसवलं, नवऱ्यापासून घ्यायला लावला तलाक; कोर्टाने तरुणाला दिली लग्नाची शिक्षा

विवाहितेला फसवलं, नवऱ्यापासून घ्यायला लावला तलाक; कोर्टाने तरुणाला दिली लग्नाची शिक्षा

लग्न केलं नाही तर जामीन रद्द होईल आणि जेलची हवा खावी लागेल असंही कोर्टाने सुनावलं.

    इंदूर 4 सप्टेंबर: मध्य प्रदेशातल्या इंदूर हायकोर्टाचा एका निर्णयाची सध्या जोरदार चर्चा होते आहे. एका तरुणाने विवाहितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. नवऱ्यापासून तिला तलाक घ्यायला भाग पाडलं. लग्नाचं अमिष दाखवून तिच्यासोबत राहिला नंतर मात्र लग्नाला नकार दिला. त्यानंतर पीडित महिला कोर्टात गेली. आता कोर्टाने त्याला दोन महिन्यात तिच्याशी लग्न करण्याची शिक्षा सुनावली असून लग्न न केल्यास जामीन रद्द होणार असल्याचंही बजावलं आहे. हा तरुण आणि ती महिला 2017पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्याने तिला लग्न करण्याचे आमीष दाखवले होते. त्यामुळे तिने नवऱ्यापासून जानेवारी 2020मध्ये तलाक घेतला. त्यानंतर मात्र त्याने लग्नास नकार दिला. सर्वच आधार गमावलेल्या त्या महिलेने पोलिसांमध्ये बलात्काराचा गुन्हा नोंदवला. नंतर त्याला अटक करण्यात आली. प्रकरण हाय कोर्टापर्यंत गेलं. नंतर त्या तरुणाने जामीनासाठी अर्ज करत लग्न करण्याची तयारी दाखवली. कोर्टाने प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर त्या तरुणाला तिच्याशी 2 महिन्यात लग्न करण्याची शिक्षा दिली. महिलेसोबत तीन वर्ष राहूनही  तिच्याशी लग्नास नकार दिल्याने महिलेचा आधारच गेला होता. या प्रकरणात तिने हायकोर्टापर्यंत लढा दिला. शेवटी सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर तडजोडीची सूचना केली होती. लग्न केलं नाही तर जामीन रद्द होईल आणि जेलची हवा खावी लागेल असंही कोर्टाने सुनावलं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या