Home /News /national /

लॉकडाउनमध्ये शनायाऐवजी न्यूज चॅनेलकडे वळला मोर्चा... 57% प्रेक्षक वाढले

लॉकडाउनमध्ये शनायाऐवजी न्यूज चॅनेलकडे वळला मोर्चा... 57% प्रेक्षक वाढले

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अपडेट राहण्यासाठी टिव्हीवरील न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांमध्ये वाढ झाली आहे

    मुंबई, 30 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं. यातच कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णसंख्येमुळेही लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. परिणामी लॉकडाऊनदरम्यान नागरिक घरी असतानाही टिव्ही पाहत असले तरी न्यूज चॅनल पाहण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात नेटफ्लिक्स किंवा इतर ओटीटी प्लॅटफॉर्मना जास्त मागणी वाढेल अशी शक्यता होती, मात्र त्याच्या उलट गेल्या आठवडाभराच्या काळात बातम्यांना दर्शक पसंती देताना दिसत आहेत. सीएनएन न्यूजला BARC चे सीईओ सुनील लुल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात न्यूज चॅनल पाहणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे प्रमाण तब्बल 57 टक्के इतके आहे. एकूण बांतम्या बघण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे घरातील लहान मुलं आणि तरुणही बातम्या बघण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसते. याशिवाय सध्या चॅनल्सवर मालिकांचं रिपिट टेलिकास्ट सुरू असल्याने प्रेक्षकांनी मोर्चा न्यूज चॅनलकडे वळवला आहे. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर निघणे शक्य नसल्याने सर्वाधिक सहज पर्याय हा टिव्ही न्यूज चॅनेल्स आहे. त्यात कोरोना आणि लॉकडाऊनबाबत अपडेट राहणं ही आवश्यक आहे. मात्र मोबाईलमधून आलेल्या बातम्यांच्याबाबत विश्वासार्हता हा मोठा प्रश्न असतो. मात्र वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे आणि काही अंशी रेडिओने त्यांची विश्वासार्हता अद्यापही टिकवून ठेवली असल्याने घरातील सर्वांसाठीच बातम्या पाहणे हा सहज पर्याय झाला आहे. बाहेर असताना अपरिहार्यपणे मोबाईल किंवा स्मार्टफोनवर बातम्या आणि इतर अपडेटससाठी अवलंबून असलेला तरुण वाचकही घरी असल्याने टिव्हीवर वृत्तवाहिन्या पाहताना दिसत आहे. केवळ हिंदीच नाही तर सर्वच प्रादेशिक भाषांमध्ये बातम्या पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. संबंधित - धोका वाढला! Coronavirus च्या कम्युनिटी ट्रान्समिशनबाबत सरकारने दिली नवी माहिती वृत्तवाहिन्या दर अर्ध्या तासाने देत असलेल्या अपडेटेड बातम्या, त्यातून सद्यस्थिती आणि दृश्यांद्वारे देशभरात नेमके या काळात काय सुरु आहे, याचे ज्ञान प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचते. त्यामुळे वृत्तवाहिन्यांना ही पसंती मिळत आहे. केवळ लॉकडाईनच्या काळापुरतेच ही पसंती राहणारी नाही, गेल्या वर्षी बालाकोट हल्ला असो वा कलम 370 सारख्या मुद्द्यांवरही अनेक दर्शकांनी वृत्तवाहिन्यांवर विश्वास दर्शवला होता. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असून हा एक नवा ट्रेण्ड तयार होत असल्याचे निरीक्षण लुल्ला यांनी मांडले आहे. स्मार्ट फोन आणि मोबाईलच्या प्रवाहात टीव्ही चॅनेल्सचे महत्त्व कमी होईल अशी चिंता वाटत असतानाच हा बदल सकारात्मक असल्याचे निरीक्षण व्यक्त होते आहे. येता काळ वृत्तवाहिन्यांसाठी अधिक चांगला काळ असण्याची शक्यता या निमित्ताने वर्तवली जाते आहे. संबंधित - कोरोनाच्या लढ्यात नाम फाऊंडेशनकडून 1 कोटींची मदत, सहकार्य करण्याच नानांचं आवाहन पंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊनच्या भाषणाने तोडला IPL चा रेकॉर्ड बार्क इंडियाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 24 मार्च रोजी लॉकडाऊनसंदर्भात केलेले भाषण टिव्हीवर सर्वाधिक पाहिलं गेलं आहे. त्याच्या तुलनेत आयपीएलचा अंतिम सामना पाहणाऱ्यांची संख्याही मागे पडली आहे. हे भाषण सुमारे 201 चॅनलवर दाखविण्यात आले. आयपीएलची अंतिम मॅच 13.3 कोटी जनतेने पाहिली होती. तर पंतप्रधान मोदींचे लॉकडाऊनचे भाषण 19.7 कोटी लोकांनी पाहिली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या