नेत्याची जीभ घसरली; निर्मला सीतारमण यांची काळ्या नागिणीशी तुलना

नेत्याची जीभ घसरली; निर्मला सीतारमण यांची काळ्या नागिणीशी तुलना

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर राग व्यक्त केला जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 5 जुलै : टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले आहे. बांकुरा येथे टीएमसीचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी जाहीर सभेत अर्थमंत्र्यांची तुलना 'काळ्या नागिणी'शी केली आहे.

ते म्हणाले की, ज्या प्रकारे 'सर्प' (विषारी साप) चावल्यामुळे माणसे मरतात, त्याचप्रमाणे निर्मला सीतारमण यांच्यामुळेही लोक मरत आहेत. अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. निर्मला सीतारमण सर्वात वाईट अर्थमंत्री आहेत.

हे वाचा-एका दिवसाचे 1 लाख रुपये; बिल भरलं नाही म्हणून कोरोना योद्ध्याला ठेवलं ओलीस

तर दुसरीकडे टीएमसी नेत्याच्या या वक्तव्यावर केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री देबाश्री चौधरी म्हणाल्या, तुम्हाला टीएमसीकडून काय अपेक्षा आहे? विशेषत: कल्याण बॅनर्जीसारख्या व्यक्तीकडून? ते खासदार आहेत, परंतु ते कधीही महिलांचा आदर करीत नाही. पहिल्या महिला अर्थमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री यांच्यासाठी त्यांनी वापरलेले शब्द खूप निराशाजनक आहेत. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे

हे वाचा-भारत-चीन तणावाचा झोमॅटोला मोठा फटका; आकडा ऐकून व्हाल हैराण

गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळापासून जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. यादरम्यान देशातील उद्योग धंदे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना मोठा परिणाम सहन करावा लागला. परिणामी सरकारलाही याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. टीएमसी नेत्याच्या अशा वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी या नेत्याच्या वक्तव्यावर राग व्यक्त केला आहे.

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: July 5, 2020, 9:07 PM IST

ताज्या बातम्या