Home /News /national /

पाकड्यांनो, सावधान! भारताच्या सीमारेषेवर अत्याधुनिक ड्रोन होणार तैनात

पाकड्यांनो, सावधान! भारताच्या सीमारेषेवर अत्याधुनिक ड्रोन होणार तैनात

आता दहशतवाद्यांचे भारताच्या सीमेत घुसण्याचे सर्व मनसुबे धुळीस मिळणार आहे. कारण बीएसएफच्या ताफ्यात अत्याधुनिक एन्टी ड्रोन सिस्टम दाखल होणार आहे.

    नवी दिल्ली, 20 जानेवारी: आता दहशतवाद्यांचे भारताच्या सीमेत घुसण्याचे सर्व मनसुबे धुळीस मिळणार आहे. कारण बीएसएफच्या ताफ्यात अत्याधुनिक एन्टी ड्रोन सिस्टम दाखल होणार आहे. त्यामुळं सीमारेषेवरून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यास मदत होणार आहे. अत्याधुनिक एन्टी ड्रोन सिस्टीम गृह मंत्रालयाच्या मंजुरीनंतर भारतातील एका कंपनीन अत्याधुनिक ड्रोन सिस्टीम तयार केली आहे. ही एन्टी ड्रोन सिस्टीम भारताच्या सीमारेषेवर लक्ष ठेवणाऱ्या ड्रोनवर नजर ठेवणार आहे.  सुरुवातील बीएसएफच्या ताफ्यात 10 एन्टी ड्रोन सिस्टीम दाखल होणार आहे. पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर हा ड्रोन तैनात करण्यात येणार आहे. या ड्रोनमध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहे. भारतीय कंपनी तयार करणार ड्रोन एन्टी ड्रोन सिस्टीम पूर्णपणे भारतीय असणार आहे. भारतीय कंपनी ही ड्रोन सिस्टीम तयार करणार आहे. लवकरच एन्टी ड्रोन सिस्टीम तयार होणार आहे. ड्रोन खरेदीसाठी गृह मंत्रालयात फाईल पाठवण्यात आली आहे. लवकरच ड्रोनची खरेदी करून सीमारेषेवर तैनात केली जाणार आहे. पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी थांबणार ? सीमारेषेवर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होतेय. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आणि इतर साधनांचा वापर करून दहशतवादी भारतीय सीमारेषेत घुसवले जातात. त्यामुळं पाकिस्तानच्या सीमारेषेवर अत्याधुनिक एन्टी ड्रोन सिस्टीम तैनात करण्यात  येणार आहे.  त्यामुळं पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत पाठवण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध लागण्यास मदत होणार आहे.  एन्टी ड्रोन सिस्टीममध्ये जामर आणि सेन्सर असणार आहे. तसेच यात 360 डिग्री नियंत्रण ठेवण्याची प्रणाली आहे. त्यामुळं भारताच्या सीमेत घुसखोरी करणाऱ्या कोणत्याही ड्रोनवर लक्ष ठेवता येणार आहे. ड्रोनमध्ये असणार कॅमेरे बीएसएफच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एन्टी ड्रोन सिस्टीमध्ये अनेक कॅमेरे असणार आहे. तसेच ड्रोनमध्ये अत्याधुनिक सर्व सुविधा असणार आहे. रेडिओ फ्रीक्वेन्सी रिसीवर, इलेक्ट्रो ऑप्टिक सेंसर, जॅमर आणि नियंत्रण मिळवणारी सर्व साधने एन्टी ड्रोन सिस्टीममध्ये उपलब्ध असणार आहे. ड्रोनची दिशाही यामुळं रडावर अचुक सांगता येणार आहे. 5 सेकंदात शत्रुचं सिग्नल होणार जाम एन्टी सिस्टीम ड्रोनची क्षमता प्रचंड असणार आहे. ड्रोन केवळ 5 सेकंदात शत्रुच्या ड्रोनची सर्व सिग्नल जाम करू शकणार आहे. पाकिस्तान खेळी करून फ्री प्रोग्रॅम ड्रोन भारतात पाठवत असेल तर त्यालाही जाम करता येणार आहे. नवा ड्रोन लहान आकाराचा असणार आहे. तैनात करण्याची प्रक्रियाही सोपी असणार आहे. केवळ 10 मिनिटात हा ड्रोन आंतरराष्ट्रीय सीमेच्या कोणत्याही भागात तैनात करता येणार आहे. कुठेही घेऊन जानं सहज शक्य नवा ड्रोन आकारान लहान असणार आहे. तसेच ड्रोनला लहान लहान तुकट्यात उघडता येणार आहे. त्यामुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ड्रोनला घेऊन जाणं शक्य होणार आहे. ड्रोन सात दिवस चौवीस तास काम करणार आहे. एकाच वेळी शत्रुच्या अनेक ड्रोनचा शोध यामुळं लागणार आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक घडामोडींवर लक्ष पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर प्रत्येक दिवशी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळं पाकिस्तानची अशी घुसखोरी या ड्रोनमुळं हाणून पाडली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी तर पाकिस्तान आणि आयएसआयकडून ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यात आली होती. त्याचा तपास एनआयएकडून सुरू आहे. मात्र बीएसएफ आता पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी 10 जागांवर ड्रोन तैनात करणार आहे. त्यामुळं पाकिस्तानच्या कुरापती वेळीच रोखता येणार आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Border new drone, India border news, Pakisthan india news

    पुढील बातम्या