'मृत्युंजय महादेवा,तुला शरण आलो', भय्यूजी महाराजांचं शेवटचं टि्वट !

'मृत्युंजय महादेवा,तुला शरण आलो', भय्यूजी महाराजांचं शेवटचं टि्वट !

भय्यूजी महाराजांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये "कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी कुणालातरी जबाबदारी द्या. मी आता सोडून जात आहे. मी निराश झालोय"

  • Share this:

इंदूर, 12 जून : आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईट नोट लिहिली आणि टि्वटही केलं होतं.

भय्यूजी महाराजांनी आपल्या टि्वटर अकाऊंट @bhaiyujimaharaj वर दुपारी 1.57 वाजता शेवटचं टि्वट केलं. हे टि्वट मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छा देणारं होतं. या शुभेच्छासोबत एक पोस्टर टि्वट केलं होतं.

या पोस्टवर संस्कृतमधून वाक्य लिहिलेली होती. याचा अर्थ "जन्म, मृत्यू, वार्धक्य यांनी पीडित असणारा, तसंच कर्म बंधनात अडकलेल्या मला, हे मृत्युंजय महादेवा, मला वाचव. मी तुला शरण आलो आहे", असा होता.

भय्यूजी महाराजांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये "कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी कुणालातरी जबाबदारी द्या. मी आता सोडून जात आहे. मी निराश झालोय" असं भय्यूजी महाराजांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

भय्यू महाराजांच्या टि्वट आणि सुसाईट नोटवरून ते किती तणाव खाली होते याची प्रचिती येते.

 

कोण आहेत भय्यूजी महाराज?

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू (राजकीय गुरू)

अनुयायांकडून 'राष्ट्रसंत' उपाधी

नाव : डॉ. उदयसिंह देशमुख

जन्म : 29 एप्रिल 1968

जन्मगाव : सृजलपूर, इंदूर

20 व्या वर्षी मॉडेलिंग

दृष्टांत झाल्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश

1996 मध्ये सूर्योदय परिवार आणि आश्रमाची स्थापना

वेगवेगळ्या संस्थांच्या स्थापनेत वाटा

अनेमिक रुग्णांसाठी विशेष काम

भारतभरात 11,11,111 झाडं लावण्याचा संकल्प

विलासराव देशमुख आणि अनेक नेत्यांचे गुरू

2 वर्षांपूर्वी पत्नीचं हृदयविकाराने निधन

 

संबंधीत बातम्या

अाध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची आत्महत्या

फोटो गॅलरी : पंतप्रधान मोदी ते सेलिब्रेटींसोबत भय्यूजी महाराज

हे आहेत भय्यूजी महाराजांचे शेवटचे शब्द, आता कुटुंबाची जबाबदारी घ्या!

महागड्या गाड्या आणि घड्या, भय्यूजी महाराजांची आलिशान लाईफस्टाईल

राजकारण्यांचे संकटमोचक, भय्यूजी महाराज!

भय्यूजी महाराजांची चटका लावणारी एक्झिट - मान्यवरांच्या प्रतिक्रिया

First published: June 12, 2018, 6:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading