धक्कादायक! मजुराने अंथरुणाला खिळलेल्या आईला जिवंत जाळलं; कारण ऐकून पायाखालची जमीन सरकेल

धक्कादायक! मजुराने अंथरुणाला खिळलेल्या आईला जिवंत जाळलं; कारण ऐकून पायाखालची जमीन सरकेल

65 वर्षीय महिला शांता अम्मा यांचे पाच वर्षांपूर्वी कमरेचे हाड तुटले होते. अशात त्या अंथरुणाला खिळलेल्या होत्या.

  • Share this:

हैद्राबाद, 28 मे : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमुळे आपली नोकरी गमावलेल्या एका मजुराने अत्यंत भयावह पाऊल उचललं आहे. लॉकडाऊनमुळे नोकरी गेली आणि आईवरील उपचारासाठी हातात पैसे नसल्याने त्याने आईला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा महिला झोपली होती तेव्हा तिचा 45 वर्षीय मुलगा तिरुमाला लिंगस्वामी याने हे घातक पाऊल उचललं. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की तेलंगणाची राजधानी हैद्राबादपासून 120 किमी अंतरावर नलंगोडाच्या नरसिंहबटला गावातील निवासी तिरुमला याला लॉकडाऊनमुळे आर्थिक चणचण होती. आपण कोणाचीही जबाबदारी घेऊ शकत नसल्याचे त्याने आपल्या बहिणींना सांगितले होते. त्यातच तिरुमला याने आपल्या आईला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली. आईला जाळल्यानंतर तिरुमाला घटनास्थळावरुन फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 65 वर्षीय महिला शांता अम्मा यांचे पाच वर्षांपूर्वी कमरेचे हाड तुटले होते. अशात त्या अंथरुणाला खिळलेल्या होत्या. तिरुमला आणि त्याच्या 3 बहिणींनी आईकडे लक्ष देण्यासाठी एक केअरटेकर ठेवला होता. मात्र पैसे न दिल्याने तो ही येण्याचा बंद झाला.

नलगोंडा ग्रामीण पोलिसातील सब-इन्स्पेक्टर राजेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, शेजारील गावात राहाणारी त्यांची मुलगी आठवड्यात एकदा यायची व त्यांना आंघोळ घालायची. अन्यथा म्हातारी महिला घरात एकटीच होती आणि कोणीच तिला मदती करण्यासाठी पुढे येत नव्हते. लॉकडाऊननंतर तिरुमला काही दिवसांसाठी एका कन्स्ट्रक्शन साइटवर होता मात्र काही दिवसांनंतर तो गावी पोहोचला. लॉकडाऊनमुळे केअरटेकर नव्हता आणि त्याची बहिणही आईला पाहायला आली नव्हती. त्या भरात त्याने आईची हत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या आजारी आईची परिस्थिती तो पाहू शकला नाही. या बाबतीत तिरुमला याच्या बहिणीनेही वेगळीच बाब पोलिसांना सांगितली. या बहिणींनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक अडचण दूर करण्यासाठी तिरुमला घर विकण्यासाठी त्याच्या आईवर जबरदस्ती करीत होता. त्यातूनही हा हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  तिरुमला याची पत्नी काही महिन्यांपूर्वी आपल्या दोन मुलांसह घर सोडून निघून गेली होती.

हे वाचा-विद्यार्थ्यांनी 11 लाख जमा करुन मुंबईतील 174 मजुरांना विमानाने पाठवलं गावी

First published: May 28, 2020, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading