मराठी बातम्या /बातम्या /देश /

घटस्फोट सोडा, पतीचीच सुप्रीम कोर्टाकडून कानउघडणी; थेट तुरुंगात पाठविण्याचा दिला इशारा

घटस्फोट सोडा, पतीचीच सुप्रीम कोर्टाकडून कानउघडणी; थेट तुरुंगात पाठविण्याचा दिला इशारा

घटस्फोटासाठी या व्यक्ती कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टात झालेला प्रकार पाहून पतीने शेवटी स्वत:चेच कान धरले असेल.

घटस्फोटासाठी या व्यक्ती कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टात झालेला प्रकार पाहून पतीने शेवटी स्वत:चेच कान धरले असेल.

घटस्फोटासाठी या व्यक्ती कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टात झालेला प्रकार पाहून पतीने शेवटी स्वत:चेच कान धरले असेल.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : सुप्रीम कोर्टात (Supreme Court ) एका दाम्पत्यामधीव वाद प्रकरणात सुनावणी करताना पतीला फटकारण्यात आलं. आणि पत्नीचा सन्मान कायम ठेवत तिला घरी घेऊन जाण्याचा आदेश दिला. जर पतीने पत्नीला सन्मान दिला नाही, तर त्याला तुरुंगात जावं लागेल, असंही कोर्टाने यावेळी सांगितलं. हा वाद शांत होईपर्यंत काही वेळ त्याच्यावर न्यायालयाकडून लक्ष ठेवण्यात येईल.

पत्नीने सांगितलं होतं हे कारण...

मुख्य न्यायधीश न्यायमूर्ती एन वी रमण आणि न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या पिठाने राजधानी पाटना येथील राहणाऱ्या व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करीत होते. या व्यक्तीचे पत्नीसोबत वाद होते, त्यामुळे त्याचा न्यायालयीन वाद सुरू होता. पीठाने सुरुवातील रांची येथील कांके भागातील निवासी महिलेची विचारपूस केली. ती सासरी जाण्यास तयार असल्याचा सवाल केला. त्यावेळी महिला म्हणाली की, मी जायला तयार आहे. फक्त टॉर्चर करू नका.

हे ही वाचा-पत्नीकडून नपुंसकतेचा खोटा आरोप,पतीने क्रुरतेच्या आधारे दिला घटस्फोट;SCची मान्यता

पत्नीला सन्मान दिला नाही तर जावं लागेल तुरुंगात

न्यायमूर्ती सुर्यकांत यांनी व्यक्तीला विचारलं की, तुम्ही सर्व खटले मागे घेऊ इच्छिता का? जामीनासाठी प्रयत्न तर करीत नाही ना? मात्र आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आम्ही ही याचिका बराच काळ चालवू. अन्यथा तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. यानंतर पती म्हणाला की, तो पत्नीला वाईट वागणूक देणार नाही आणि शांततेत तिच्यासोबत राहील.

कोर्टाने सर्व खटले परत घेण्याचा दिला आदेश

न्यायमूर्ती सुर्यकांत यांनी व्यक्तीला न्यायालयात दिलेलं वचन तोडलं तर इशारा दिला आहे. याशिवाय येत्या दोन आठवड्यात तो घटस्फोटासह पत्नीविरोधात केलेल्या याचिका परत घेण्यात असल्याचं सांगितलं. यादरम्यान पत्नीला सन्मान देत तिला घरी घेऊन जाणार असल्याचंही सांगितलं.

कोर्टाने वकिलाला फटकारलं

व्यक्तीच्या बाजूने लढणारे वरिष्ठ वकील आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अंजना प्रकार यांना म्हणाले की, वकील पती-पत्नीमधील विवादावर सौहार्दपणे सोडविण्याचा सल्ला देऊ शकल्या असत्या. 

First published:

Tags: Bihar, Divorce, FAMILY, Supreme court