Home /News /national /

आईचं छत्र हरपलेल्या 5 वर्षांच्या निरागस मुलीमुळे न्यायाधीशही झाले भावुक; कोर्टाने घेतला झटपट निर्णय

आईचं छत्र हरपलेल्या 5 वर्षांच्या निरागस मुलीमुळे न्यायाधीशही झाले भावुक; कोर्टाने घेतला झटपट निर्णय

या 5 वर्षांच्या मुलीने आपल्या आईच्या मृत्यूचा धक्कादायक खुलासा केला

    जोधपुर, 9 डिसेंबर : राजस्थान हायकोर्टाच्या (Rajasthan Highcourt) खंडपीठात 5 वर्षांच्या निष्पाप मुलीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी झाली. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संगीत मेहता यांच्या खंडपीठाने ही सुनावणी केली. खंडपीठात सुनावणी झाली तेव्हा मुलीचे आजी-आजोबा, मावशी, वडील, त्यांचे आई-बाबा आणि आत्या कोर्टात हजर होते. हायकोर्टाचे न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी मुलीला आपल्याकडे बोलावलं आणि विचारलं की तिला कोणाबरोबर राहायचे आहे? त्यानंतर त्या निष्पाप मुलीने तिच्या मावशीबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर न्यायाधीशांनी मुलीला तिच्या मावशीसह पाठविण्याचे आदेश दिले. दु:खद म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला हरियाणामध्ये या मुलीच्या आईचे निधन झाले होते. यानंतर महिलेच्या माहेरच्यांनी हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांवर केला आहे. तेव्हापासून ही मुलगी आपल्या आजोबांसोबत (वडिलांचे वडील) राहत आहे. आता मृत महिलेचे वडील आणि मुलीच्या आजोबांनी तिला आपल्याकडे ठेवण्यासाठी विनंती केली. मुलीने सांगितलं की वडिलांनी केली आईची हत्या मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांच्या लवणियाचे आजोबा मोहनसिंग यांनी हेबियस कॉर्पसची याचिका दाखल केली आणि खंडपीठाला सांगितले की, त्यांची मुलगी सुनीता कंवर हिचे हरियाणा येथील भिवानी येथे राहणाऱ्या परविंदर सिंगशी लग्न झाले होते. या वर्षाच्या सुरुवातीला सुनीता कंवर हिची हत्या केल्याचा आरोप मोहन सिंग यांनी केला आहे. हत्येच्या वेळी लवणिया तिच्या आईबरोबर होती. त्यांनी दावा केला आहे की, मुलीच्या म्हणण्यानुसार तिच्या आईची हत्या वडिलांनी केली आहे. असे असूनही, भिवानी संशोधन अधिकारी आणि बाल कल्याण समितीने 19 मार्च 2020 रोजी मुलीचा ताबा तिचे वडील आणि आजोबांकडे दिला. मुख्य साक्षीदार असल्याने तिच्या आजी आजोबांसमवेत राहणाऱ्या मुलीच्या जिवाला धोका आहे. ही मुलगी आधीपासूनच जोधपूरमधील एका शाळेत शिकत होती. अशा परिस्थितीत ही मुलगी परत तिच्या मावशी सुमित्रा कंवरकडे सोपवावी. मुलीला कोर्टात हजर करण्याचे दिले आदेश या प्रकरणातील सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर अखेरच्या खंडपीठाने जोधपूरच्या पश्चिम विभागाचे पोलिस उपायुक्त यांना मुलीला 8 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. तर सोमवारी सुनावणीदरम्यान जेव्हा मुलीला न्यायालयात हजर करण्यात आलं, तेव्हा सर्वजण मुलीच्या आई आणि वडिलांच्या कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित होते. तसेच, जेव्हा मुलीने आपल्या मावशीकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा कोर्टाने मुलीला तिच्या मावशीसह पाठविण्याचे आदेश दिले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या