Home /News /national /

Yass चा थरार कॅमेऱ्यात टिपताना महिला पत्रकाराची गाडी गेली वाहून, FB LIVE करताना अश्रूंचा फुटला बांध

Yass चा थरार कॅमेऱ्यात टिपताना महिला पत्रकाराची गाडी गेली वाहून, FB LIVE करताना अश्रूंचा फुटला बांध

यास वादळाबाबत सर्व माहिती सामान्यांपर्यंत पोहोचावी, याकरता पत्रकार रस्त्यावर उतरले आहेत. जीवाची बाजी लावून विविध शहरांमध्ये यास चक्रीवादळाचं कव्हरेज (Live Coverage of Yass Cyclone) पत्रकार करत आहेत. दरम्यान असंच एक कव्हरेज करताना पत्रकारांचा जीवाची बाजी लागली आहे..

पुढे वाचा ...
    कोलकाता, 26 मे: भारताच्या पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळ (Cyclone Yass) येऊन धडकलं आहे. यासमुळे सहा राज्यात- पश्चिम बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, झारखंड, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये जोरदार पाऊस बरसणार असल्याचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओडिशा-पश्चिम बंगालसह तमिळनाडू कर्नाटकमध्ये मंगळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. किनारपट्टी भागात या वादळाचा मोठा धोका पाहायला मिळतो आहे. दरम्यान या परिस्थितीतही यास वादळाबाबत सर्व माहिती सामान्यांपर्यंत पोहोचावी, याकरता पत्रकार रस्त्यावर उतरले आहेत. जीवाची बाजी लावून विविध शहरांमध्ये यास चक्रीवादळाचं कव्हरेज (Live Coverage of Yass Cyclone) पत्रकार करत आहेत. कोलकाता शहरात देखील यासचं थैमान सुरू आहे. यावेळी चक्रीवादळाचं कव्हरेज करताना एका कोलकात्यातील टीव्ही चॅनेलच्या महिला पत्रकाराची गाडी वाहून गेल्याने मोठी खळबळ माजली होती. त्यामध्ये असणाऱ्या ड्रायव्हरला इतर पत्रकारांनी सुखरुप वाचवलं खरं पण यासचा असा अनुभव स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवणं या टीव्ही चॅनेलच्या टीमसाठी धक्कादायक होतं. हे वाचा-Cyclone Yass आज ओडिशा-बंगालच्या किनाऱ्याला धडकणार; 'या' राज्यांनाही हाय अलर्ट त्यानंतर या महिला पत्रकाराने (Female Journalist Burst into Tears) एक फेसबुक लाइव्ह केलं आहे. ज्यामध्ये त्यांची टीम अक्षरश: धाय मोकलून रडत आहे. हा अनुभव शेअर करताना त्यांना रडू आवरत नाही आहे. जवळपास मृत्यू डोळ्यासमोर पाहिल्यासारखा अनुभव या टीव्ही चॅनेलच्या टीमने अनुभवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अत्यंत तीव्र चक्रीवादळ यास बालासोरच्या दक्षिण-दक्षिण पूर्वेस सुमारे 50 किमी अंतरावर आहे. दुपारपर्यंत हे चक्रीवादळ वादळ धामराच्या उत्तरेस आणि बालासोरच्या दक्षिणेस उत्तर ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारी भाग ओलांडेल. यावेळी वादळ तीव्र रुप धारण करेल असा अंदाज आगे. यावेळी ताशी 140 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे वाचा-Prayagraj : प्रियंका गांधींनी पोस्ट केला मृतदेहांच्या अवहेलनेचा आणखी एक Video भुवनेश्वरचे बीजू पटनायक इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि झारसुगुड़ा एअरपोर्ट मंगळवारी रात्री 11 वाजता बंद करण्यात आले असून ते गुरुवारी सकाळी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दूर्गापूर आणि राउरकेला एअरपोर्टवर देखील सर्व उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत. कोलकातामधील नेताजी सुभाष चंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्टवर बुधवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून संध्याकाळी पावणे आठ वाजेपर्यंत सर्व उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत. रेल्वेने देखील बंगाल-ओडिशामधील सर्व गाड्या रद्द केल्या आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Cyclone, Kolkata

    पुढील बातम्या