मराठी बातम्या /बातम्या /देश /

आधार कार्डावर लिहिला जेलचा पत्ता, आता पोलिसांनीच केली जेलमध्ये रवानगी

आधार कार्डावर लिहिला जेलचा पत्ता, आता पोलिसांनीच केली जेलमध्ये रवानगी

आधार कार्डावर जेलचा पत्ता लिहिण्यासंदर्भात त्या व्यक्तीने अजबच दावा केला आहे

आधार कार्डावर जेलचा पत्ता लिहिण्यासंदर्भात त्या व्यक्तीने अजबच दावा केला आहे

आधार कार्डावर जेलचा पत्ता लिहिण्यासंदर्भात त्या व्यक्तीने अजबच दावा केला आहे

  • Published by:  Meenal Gangurde

लखनऊ, 5 मार्च : आधार कार्डासंबंधात नेहमीच कोणती ना कोणती बातमी समोर येत असते. एकीकड़े सरकार आधार कार्डचे महत्त्व लोकांना सांगत असतं, तर दुसरीकडे आधार कार्डचा दुरुपयोग केला जात असल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. असंच एक प्रकरण लखनऊमधून समोर आलं आहे. या प्रकरणात लखनऊ येथील एका व्यक्तीने आपल्या आधार कार्डावरील निवास स्थानाच्या ठिकाणी लखनऊ तुरुंगाचा पत्ता लिहिला.  त्यानंतर मात्र पोलिसानी त्याची त्याच तुरुंगात रवानगी केली.

सनी चौहान नावाच्या एका व्यक्तीने आपल्या आधार कार्डावर घरचा पत्ता म्हणून लखनऊ तुरुंगाचा पत्ता लिहिला होता. पोलीस एका व्यक्तीच्या मृत्युचा तपास करत असताना सुगावा काढत पोलिसांना याबाबत खुलासा झाला. संतोष तिवारी (40) नावाचा एक ड्रायव्हर गेल्या महिन्यात लखनऊबाहेरील गोसाईंगंजमधील शेखनापूर भागातील रस्त्याच्या किनाऱ्यावर मृत अवस्थेत सापडला. शवविच्छेदन अहवालानुसार त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

हे वाचा - आता कुत्रा करणार मतदान! निवडणूक आयोगानं काढलेल्या ओळखपत्राचा Photo Viral

हत्येचा तपास करताना झाला खुलासा

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अनेकांना विचारपूस करण्यासाठी बोलावले होते. यावेळी सनीच्या आधार कार्डावर लखनऊ तुरुंगाचा पत्ता असल्याचे दिसते. यानंतर सनी चौहानचे वडील लखनऊ जेलमध्ये काम करीत असल्याने हा पत्ता दिल्याचा दावा सनीने केला आहे. मात्र तपासादरम्यान वेगळीच माहिती समोर आली आहे. सनीचे वडील गँगस्टर अॅक्टअंतर्गत जेलमध्ये असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

दारू घेण्याच्या आरोपामुळे हत्या

सनी चौहानने संतोषच्या मृत्यूनंतर 24 फेब्रुवारी रोजी ट्रान्सपोर्टरला देण्यासाठी म्हणून ट्रक बाहेर काढला होता. पोलिसांनी दिलेल्य़ा माहितीनुसार सनीने दारुच्या नशेत 4 लोकांसोबत मिळून संतोष तिवारीची हत्या केली होती. संतोषने आपल्या मित्रांकडून दारु खेचून घेतल्यानंतर रागाच्या भरात सनीने त्याची हत्या केली. बुधवारी सनीला अटक करण्यात आली असून हत्येत सहभागी अन्य आरोपींचा तपास सुरू आहे.

हे वाचा - आईची माया आटली, घरकाम केलं नाही म्हणून 12 वर्षाच्या चिमुरड्याला दिले चटके

First published:

Tags: Aadhar card, Jail