Home /News /national /

बापरे! रुग्णालयाने दिलं 28 लाखांचं बिल; कोरोना रुग्णाने नकार दिल्यास ठेवलं ओलीस

बापरे! रुग्णालयाने दिलं 28 लाखांचं बिल; कोरोना रुग्णाने नकार दिल्यास ठेवलं ओलीस

राज्यसरकारने नियमावली जारी केली असली तरी अनेक रुग्णालयांकडून अतिरिक्त पैसे आकारले जात आहे

    नवी दिल्ली, 13 जुलै : गुरुग्राम येथील काही खासगी रुग्णालयांना कोरोनाची महासाथ म्हणजे पैसे मिळवण्याचे साधन वाटत आहे. कोविड - 19 च्या उपचारासाठी सरकारने दर निश्चित केले आहेत पण तरीही या रुग्णालयांची मनमानी थांबत नाही. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाने कोरोना रूग्णाच्या उपचारासाठी 28 लाखांचे बिल दिलं आहे. ज्याला पृथ्वीवर देवाचे अवतार म्हटले जाते अशा डॉक्टरांवर बर्‍याचदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही खासगी रुग्णालये रुग्णांच्या असहायतेचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात पैसे आकारत आहेत.  कोरोना साथीत डॉक्टरांनी जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार केले आणि देशाने त्यांचं कौतुक केले. परंतु सत्य हे देखील आहे की या पेशाशी संबंधित काही लोक अजूनही पांढर्‍या कपड्यांच्या मागे काळा पैसा मिळविण्याच्या उद्देशाने आहेत. हे प्रकरण गुरुग्रामचे आहे. मेदांता रुग्णालयावर असे आरोप आहेत की उपचाराची संपूर्ण रक्कम न दिल्याने रुग्णास सोडण्यात आले नाही. कोरोना रूग्णाच्या 40 दिवसांच्या उपचाराचे बिल 28 लाख केले, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. हे वाचा-Google कडून भारतासाठी आली आनंदाची बातमी! Digital India साठी 10 अब्ज डॉलर्स रुग्णालयाला नोटीस बजावली केंद्र सरकारने कोरोना साथीच्या आजारावरील उपचारांची किंमत निश्चित केली होती, परंतु अद्यापही खासगी रुग्णालयांकडून उपचाराचाच्या नावाखाली लूटीच्या अनेक घटना समोर येत आहेत. याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गुरुग्राममधील हे पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या