• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • देशभरातील पर्यटकांसाठी पर्वणी, दिल्लीतील मुघल गार्डन होणार खुलं

देशभरातील पर्यटकांसाठी पर्वणी, दिल्लीतील मुघल गार्डन होणार खुलं

मुघल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुले राहणार असून सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजपर्यंत गार्डन पाहता येणार आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डन आगामी एक महिना सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे. जवळपास संपूर्ण एक महिना हे मुघल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुले राहणार असून सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजपर्यंत गार्डन पाहता येणार आहे. राष्ट्रपती भवनातील मागच्या बाजूला असलेल्या जवळपास पंधरा एकरच्या विस्तीर्ण अशा जागेवर मुघल गार्डन आहे. मुघल गार्डनला तीन टप्प्यात विभागण्यात येते. कोरोनाच्या काळामध्ये सर्व नियमाचे पालन करत यावर्षी मुघल गार्डन खुले करण्यात आलं आहे. सॅनिटायझर आणि मास्कचा वापर या गार्डनची सैर करताना सक्तीचा करण्यात आलेला आहे. यावर्षी सर्वसामान्य नागरिकांना मुघल गार्डनची सैर करताना मोबाईल बाळगता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने मुघल गार्डनची सैर आरक्षित करावी लागत असून एका टप्प्यांमध्ये फक्त शंभर लोकांनाच प्रवेश मिळणार आहे. असे पाच तासासाठी पाच टप्पे दिवसभर राहणार आहे, अशी माहिती राष्ट्रपती भवनातील अधिकारी कीर्ती तिवारी यांनी दिली. यावर्षी मुघल गार्डनमध्ये जवळपास 138 प्रकारचे गुलाब पाहायला मिळणार असून जवळपास 78 प्रकारातील सिझनल फुले पाहता येणार आहे .सोबतच यावर्षी हर्बल गार्डनमध्ये नवीन प्रकारच्या औषधांचं देखील प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. ऑरगॅनिक व्हेजिटेबल गार्डनमध्ये जैविक पद्धतीने कशी शेती केली जाते हे देखील पाहता येणार आहे. कोरोनामुळे यावर्षी परदेशातून टुलीप मागविता आले नाही त्यामुळे मुगल गार्डनचे आकर्षण ठरणारे टुलीपची फुले यावर्षी पाहायला मिळणार नाही, अशी माहिती मुघल गार्डनचे बागायती विभाग प्रमुख विपीन जोशी यांनी दिली. दर वर्षी शेकडोंच्या संख्येने महिला पुरुष आणि बालके मुघल गार्डनला भेट देत असतात. राष्ट्रपती भवनाच्या मागच्या बाजूला असलेले हे गार्डन दरवर्षी 13 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान खुले करण्यात येते. आठवड्यातील एक दिवस म्हणजे सोमवारी हे गार्डन बंद असते. राजधानी दिल्लीला भेट देणारे पर्यटक यांच्यासाठी मुघल गार्डन पर्वणी ठरते. त्यामुळे रंगेबिरंगी फुलांचा मनस्वी आनंद घेण्याकरिता आणि गुलाबी थंडीत मुघल गार्डन पाहण्याचा आनंद वेगळाच असतो.
Published by:Akshay Shitole
First published: