या दोन राज्यात सर्वाधित वाघांचा मृत्यू; तब्बल 168 वाघांची झाली शिकार

या दोन राज्यात सर्वाधित वाघांचा मृत्यू; तब्बल 168 वाघांची झाली शिकार

काही दिवसांपूर्वी केरळमध्ये एका हत्तीणीला अत्यंत क्रुरपणे मारण्यात आले होते. देशात गेल्या 8 वर्षांत 168 वाघांची शिकार करण्यात आली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 5 जून : शिकार आणि इतर कारणांमुळे भारतात गेल्या आठ वर्षात 750 वाघांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक 173 वाघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) माहिती अधिकार कायद्यांतर्गत वृत्तसंस्था पीटीआयने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे.

त्यात म्हटले आहे की, यापैकी 369 वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आणि 168 वाघांचा शिकार केल्यामुळे मृत्यू झाला. 70 मृत्यू अद्याप तपासात आहेत, तर 42 वाघांचा अपघात आणि इतर कारणांनी मृत्यू झाला आहे.

एनटीसीएने म्हटले आहे की, 2012 ते 2019 या आठ वर्षांच्या कालावधीत 101 वाघांचे अवशेषही देशभरात सापडले. 2010 मे ते 2020 या कालावधीत वाघाच्या मृत्यूबाबतची माहिती शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले. यात 2012 पासून  आठ वर्षांच्या कालावधीचे तपशील दिले गेले. पर्यावरण, वन व हवामान मंत्री प्रकाश जावडेकर यांनी डिसेंबरमध्ये सांगितले की, देशात मागील चार वर्षांत वाघांची संख्या 750 ने वाढली आहे आणि आता एकूण वाघांची संख्या 2,226 वरून 2,976 वर गेली आहे. जावडेकर यांनी राज्यसभेत पूरक प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की आता वाघांच्या संख्येत 2976 आहे. ते पुढे म्हणाले की गेल्या 4 वर्षांत वाघांच्या संख्येत 750 ने वाढ झाली आहे.

एनटीसीएने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ वर्षांत मध्य प्रदेशात सर्वाधिक 173 वाघांचा मृत्यू झाला. यापैकी 38 वाघांचा शिकार झाल्यामुळे मृत्यू झाला, तर 94  वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आणि 19 वाघांच्या मृत्यूचा अद्याप तपास सुरू आहे. अनैसर्गिक कारणांमुळे सहा वाघांचा मृत्यू झाला आणि 16 अवशेषही सापडले. देशात मध्य प्रदेशात सर्वाधिक 526 वाघ आहेत.

महाराष्ट्रात 125 वाघ ठार

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 8 वर्षांत वाघांच्या मृत्यूच्या प्रकरणात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानवर आहे. येथे 125 वाघांचा मृत्यू झाला. त्यानंतर कर्नाटकात 111, उत्तराखंडमध्ये 88, तामिळनाडूमध्ये 54, आसाममध्ये 54, केरळमध्ये 35, उत्तर प्रदेशात 35, राजस्थानात 17, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये 11 आणि छत्तीसगडमध्ये 10 वाघांचा मृत्यू झाला आहे. एनटीसीएने म्हटले आहे की या कालावधीत ओदिषा आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी 7-7, तेलंगणामध्ये पाच, दिल्ली आणि नागालँड 1-1, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक-ओक वाघांचा मृत्यू झाला आहे.

First published: June 5, 2020, 10:40 AM IST
Tags: tiger

ताज्या बातम्या