नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटाची न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. 22 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. पण, निवडणूक आयोगाने 19 तारखेपर्यंत मुदत दिल्यामुळे शिवसेनेनं सुनावणी घेण्याची विनंती केली. पण सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची मागणी फेटाळली असून वेळेवरच सुनावणी होणार आहे.
शिवसेना कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी पाच याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलत 22 ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे.
परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला कागदपत्र सादर कऱण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे याचिका लिस्ट करण्याची शिवसेनेनं मागणी केली. पण अजून कुठलाही निर्णय आम्ही दिला नाही, असं म्हणत कोर्टाने सुनावणी घेण्यास नकार दिला. शिवसेनेवरील दाव्याप्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली. पण सुप्रीम कोर्टाने सांगितले की, सुनावणी आपल्या वेळेवर होईल.
शिवसेनेच्या दाव्याबाबत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. पुढील आठवड्यात निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्याआधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची मागणी उद्धव ठाकरे यांच्या गोटातून होत आहे. मात्र आज सुप्रीम कोर्टाने सांगितले की, ठरलेल्या वेळेतच सुनावणी होणार आहे
केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन आठवड्यात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश शिवसेनेला दिले होते. आयोगानं ठाकरे गटाला २ आठवड्याची मुदत दिली होती. पण, शिवसेनेनं 4 आठवड्यांची मुदत मागितली होती. पण आयोगाने शिवसेनेची 4 आठवड्याची मागणी फेटाळली होती. २३ ॲागस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आयोगाचे आदेश कायम आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.