रक्ताअभावी उपचार थांबलेल्या रुग्णासाठी आरोग्यमंत्री धावले, स्वत: केलं रक्तदान

80 वर्षीय शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या पत्नीच्या उपचाराची वाट पाहत होते, अखेर...

80 वर्षीय शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या पत्नीच्या उपचाराची वाट पाहत होते, अखेर...

  • Share this:
    रांची, 16 फेब्रुवारी : आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता गुरुवारी रिम्स रुग्णालयाचे निरीक्षण करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी आपात्कालिन, आर्थो आणि न्युरो सर्जरी वॉर्डाचे निरीक्षण केले. यादरम्यान त्यांनी पाहिले की अनेक रुग्णांवरील उपचार रक्ताअभावी व पैसे कमी असल्याने होत नव्हते. ऑर्थो वॉर्डमध्ये गेल्या 9 दिवसांपासून दाखल असलेल्या शीला देवा यांचा उपचार रक्ताअभावी होत नव्हता. त्यांचे पती 80 वर्षीय रामविनय शर्मा यांनी आरोग्य़ मंत्र्यांना रुग्णालयात पाहिले. यावेळी शर्मा यांनी आरोग्य मंत्र्यांना माझी पत्नी शीला देवी यांना रक्त मिळत नसल्याचं सांगितलं. जेव्हा रक्तपेढीत गेलो तेव्हा त्यांनी कोणाकडून तरी रक्तदान करवून घेण्यास सांगितले. शर्मा वयोवृद्ध असल्याने ते रक्त देऊ शकत नव्हते. आरोग्य मंत्र्यांनी सर्वांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं रामविनय शर्मा यांनी अनेकांना विनंती केली, मात्र त्यांना कोणीच मदत केली नाही. त्यांचं ऐकल्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी तातडीने रक्त देण्याचा निर्णय घेतला. ते शर्मासोबत रक्तदान करण्यासाठी रक्तपेढीत पोहोचले. तेथे आरोग्य मंत्री गुप्ता यांनी रक्तदान केलं. आणि आरोग्य मंत्र्यांनी रक्तदान केल्यानंतर त्या रक्ताबद्दल शर्मा यांना त्यांच्या पत्नीसाठी रक्त देण्यात आलं. आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता आपल्या पथकासह रात्री आठ वाजता रिम्स येथे तपासणीसाठी पोहोचले. जमशेदपूर येथील 67 वर्षीय मानोषी भुई या महिलेवर गेल्या सात दिवसांपासून 15 हजार रुपये कमी असल्याने उपचार केला जात नव्हता. आरोग्यमंत्र्यांनीही त्यांची भेट घेतली. त्यांनी रिम्स व्यवस्थापनाला मोफत उपचार करण्याचे आदेश दिले. मानोषी यांचा मुलगा चिन्मोय भुई यांनी आरोग्यमंत्र्यांना रिम्समधील रूग्णांची दिशाभूल करुन त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले जात असल्याचे सांगितले. चिन्मय यांनी सांगितले की डॉ. रूपकाच्या सहाय्याने आपल्या रुग्णालयात 30 हजार रुपयात चांगल्या रुग्णालयात उचार केले जाईल, असं सांगितलं. आरोग्यमंत्र्यांनी रक्तदान करण्याचा संदेश दिला रिम्सचे उपअधीक्षक संजय कुमार सिंह म्हणाले की, आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी रुग्णाला रक्त देऊन प्रत्येकाला रक्तदान करण्याची प्रेरणा दिली. रिम्समध्ये दररोज 50 लोक रक्तदान करतात. दररोज 120-130 यूनिट रक्त आपात्कालीन आणि थॅलेसीमियाग्रस्त-एनस्थेशियाच्या रूग्णांना दररोज मोठ्या संख्येने दिलं जातें.. यानंतर शीला देवीला रक्ताची व्यवस्था करण्यास सांगितले.
    First published: